पुणे : कुख्यात गुंड शरद मोहोळ हत्याप्रकरणी मुख्य सुत्रधार विठ्ठल शेलार याची पुणे पोलिसांनी त्याच्या राहत्या घरापासून धिंड काढली. या कारवाईमुळे मुळशी तालुक्यातील गुंडांना जरब बसणार आहे. शरद मोहोळ हत्या प्रकरणी आतापर्यंत मुख्य सुत्रधार विठ्ठल शेलार, साहिल ऊर्फ मुन्ना पोळेकर, नामदेव कानगुडे, अमर कानगुडे, चंद्रकांत शेळके, विनायक गव्हाणकर, विठ्ठल गांदले, रामदास मारणे यांच्यासह १५ जणांना अटक केली आहे.
हेही वाचा…मोठी बातमी..! महाविकास आघाडीतील दोन नेत्यांना इडीची नोटीस, आदित्य ठाकरेंच्या नंतर रोहित पवारांच्या अडचणीत वाढ
कोथरूडच्या परिसरात शरद मोहोळची लग्नाच्या वाढदिवसानिमित्ताने ५ जानेवारीला गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. या प्रकरणी सुरूवातीला मुन्ना पोळेकर व त्याच्या साथीदारांना पोलिसांनी ताब्यात घेतले. आपल्या मामाचा बदला घेण्यासाठी मुन्ना पोळेकरने मोहोळला संपवण्याचा कट रचला होता. त्याचबरोबर विठ्ठल शेलार यालाही मोहोळला संपवून गुन्हेगारी जगतात आपल्या दहशतीचे बीज रोवायचे होते. यासाठी आरोपींनी एक महिनाआधीच हत्येचं नियोजन केलं होतं.
हेही वाचा…उद्धव ठाकरेंचा भाजप अन् संघाला दे धक्का…! डझनभर नेत्यांचा ठाकरे गटात जाहीर प्रवेश
आता गुन्हेगारीची हीच दहशत मिटवण्यासाठी पोलिसांनी विठ्ठल शेलार याची त्याच्या राहत्या घरापासून धिंड काढण्यात आली. पोलिसांनी केवळ शेलारची धिंडच काढली नाही तर त्याची बुलेटप्रुफ र्स्कॉर्पिओ गाडी देखील जप्त केलीय. आरोपीने आपली कान पुनावळेमधील त्याच्या फार्म हाऊसवर लपवून ठेवली होती. मात्र गुन्हे शाखेकडून ही गाडी जप्त करण्यात आलीय.
दरम्यान, मुळशीलीत गुंड विठ्ठल शेलार, गणेश मारणे मुख्य सुत्रधार असल्याचे पोलिसांच्या तपासात उघड झाले आहे. त्यामुळे पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने विठ्ठल शेलार आणि त्याचा साथीदार रामदास मारणे यांची मुळशी, तसेच हिंजवडी भागातून धिंड काढली.
कर्माचे फळ..! राहत्या घरापासूनच शरद मोहोळच्या मारेकऱ्याची पोलिसांनी काढली धिंड pic.twitter.com/o2WcxwcmmJ
— Political महाराष्ट्र (@PoliticalMH) January 20, 2024
READ ALSO :
हेही वाचा…मराठा आरक्षण घेऊनच मुंबईतून परतणार, मनोज जरांगे पाटलांची मुंबईकडे कुच
हेही वाचा…“कोणाच्या आशीर्वादामुळे खासदारकी मिळाली? हे विसरलात का ?” ठाकरे गटाच्या खासदाराला भाजपचा सवाल
हेही वाचा…जरांगे पाटलांचं वादळ सरकार रोखू शकणार का ? मुंबईच्या दिशेने रवाना होण्यास मराठा बांधव तयार
हेही वाचा…प्रकाश आंबेडकरांनी जरांगे पाटलांना दिला सल्ला, मनोज जरांगे पाटलांची राजकारणात एंन्ट्री होणार का ?
हेही वाचा…“रोहित पवारांना इडीची नोटीस,” शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया म्हणाले..