सोलापूर : राष्ट्रवादीचे अध्यक्ष आज सोलापुर दौऱ्यावर असून आज सकाळी हॉटेल बालाजी सरोवर येथे शहर व जिल्ह्यातील प्रमुख पदाधिकाऱ्यांनी शरद पवारांची भेट घेतली. यानंतर शरद पवारांनी सर्वसामान्य नागरिकांचे प्रश्न व त्यांच्या मागण्यांचे निवेदन स्विकारले. यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.
हेही वाचा…“रोहित पवारांना इडीची नोटीस,” शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया म्हणाले..
गेल्या काही महिन्यापासून सुरू असलेल्या वंचितच्या युतीसंदर्भात शरद पवारांनी आज भाष्य केले. प्रकाश आंबेडकर यांना महाविकास आघाडीत सामील करून घेणार का ? यावर ते म्हणाले की वंचितचे नेते प्रकाश आंबेडकर यांना इंडिया आघाडीत घेण्याबाबत बोलणं झालं आहे. राज्यातील लोकसभेच्या ४८ जागापैंकी ३५ जागांवर एकमत झालं आहे. बाकीच्या जागांबाबत चर्चा सुरू असल्याची प्रतिक्रिया शरद पवारांनी दिली.
हेही वाचा…मोठी बातमी..! महाविकास आघाडीतील दोन नेत्यांना इडीची नोटीस, आदित्य ठाकरेंच्या नंतर रोहित पवारांच्या अडचणीत वाढ
तर रोहित पवारांच्या इडी नोटीसीबाबतही त्यांनी भाष्य केले. तेव्हा अनिल देशमुख, संजय राऊत यांना तुरूंगात टाकलं. पण कोर्टाने चार्जशीट पाहून मुक्तता केली. ईडीचा वापर हे सरकारचे हत्यार आहे. सत्तेचा पुरेपूर गैरवापर केला जात आहे. रोहित पवारांना एकट्याला नाही. तर सर्वच नेत्यांना ईडीचा धाक दाखवला जात आहे. पण आम्ही शांत बसणार नाही. आम्ही कोर्टातली लढाई लढू, असा इशाराही शरद पवारांनी दिलीय.
READ ALSO :
हेही वाचा…कर्माचे फळ..! राहत्या घरापासूनच शरद मोहोळच्या मारेकऱ्याची पोलिसांनी काढली धिंड, पाहा व्हिडीओ
हेही वाचा…मराठा आरक्षण घेऊनच मुंबईतून परतणार, मनोज जरांगे पाटलांची मुंबईकडे कुच
हेही वाचा…“कोणाच्या आशीर्वादामुळे खासदारकी मिळाली? हे विसरलात का ?” ठाकरे गटाच्या खासदाराला भाजपचा सवाल
हेही वाचा…जरांगे पाटलांचं वादळ सरकार रोखू शकणार का ? मुंबईच्या दिशेने रवाना होण्यास मराठा बांधव तयार
हेही वाचा…प्रकाश आंबेडकरांनी जरांगे पाटलांना दिला सल्ला, मनोज जरांगे पाटलांची राजकारणात एंन्ट्री होणार का ?