सोलापूर : राष्ट्रवादी पक्ष फुटीनंतर राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शरद पवारांवर वयावरून अनेकदा टिका केली. यातच तुमचे वय झाले असून तुम्ही बाजूला होऊन तरूणांना संधी द्यायला हवी, असं अजित पवार यांनी शरद पवार यांना म्हटलं होतं. त्यावर आता सोलापूरात पत्रकारांशी बोलतांना शरद पवारांनी अजित पवारांना या टिकेवरून जोरदार प्रत्युत्तर दिलंय.
हेही वाचा…मराठा आरक्षण घेऊनच मुंबईतून परतणार, मनोज जरांगे पाटलांची मुंबईकडे कुच
अजित पवार यांच्या टिकेवर शरद पवार म्हणाले की, मी तरूणांना संधी देत नाही, मग अजित पवार कुठून आले आणि त्यांना कुणी आणलं? त्यांना पहिल्यांदा तिकीट कुणी दिलं आणि असं किती लोकांबद्दल सांगू? याकडे फार लक्ष द्यायचं नाही. मी कधीही हुकूमशहाप्रमाणे वागलो नाही. मी आपसात चर्चा करून निर्णय घेतो. असे शरद पवारांनी अजित पवारांना सुनावलं.
हेही वाचा…“कोणाच्या आशीर्वादामुळे खासदारकी मिळाली? हे विसरलात का ?” ठाकरे गटाच्या खासदाराला भाजपचा सवाल
दरम्यान, पक्ष फुटीनंतर अजित पवार गटाचा कर्जत येथे सोहळा पार पडला. या सोहळ्यात अजित पवारांनी थेट शरद पवारांच्या वयाचा उल्लेख केला होता. तसेच त्यांनी आता राजकारणातून निवृत्त व्हावं. अन् तरूणांना संधी द्यावी, अशी टिका केली होती. त्यावर शरद पवार गटाकडून प्रत्युत्तर देण्यात आलं होतं. मात्र त्या टिकेला आता खुद्द शरद पवारांनी प्रत्युत्तर दिलंय.
READ ALSO :
हेही वाचा…“गद्दार गॅंगचा आणखी एक खासदार आयुक्तांसोबत शासकीय खर्चात नेदरलॅंडच्या पर्यटनाला”, आदित्य ठाकरेंचा घणाघात
हेही वाचा…एकाच वेळी होणार लोकसभा अन् विधानसभेच्या निवडणुका, केंद्र सरकारकडे अहवाल तयार
हेही वाचा…“उद्धव ठाकरेंना २२ जानेवारीला काळाराम मंदिरात जाऊ देऊ नका, अन्यथा..”, भाजपने दिला इशारा, राजकारण तापणार
हेही वाचा…वंचितला महाविकास आघाडीत घेणार ? शरद पवार म्हणाले, ४८ पैकी ३५ जागांवर…
हेही वाचा…कर्माचे फळ..! राहत्या घरापासूनच शरद मोहोळच्या मारेकऱ्याची पोलिसांनी काढली धिंड, पाहा व्हिडीओ