मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नुकताच दावौस दौरा केला. या दौऱ्यात एकनाथ शिंदे यांनी दावोस मधील जागतिक आर्थिक परिषदेत सहभाग नोंदवला, तर त्यांच्यासोबत इतर अधिकारी, पदाधिकारी देखील दावोसला गेले. यावरून राज्यातील विरोधी पक्षातील नेत्यांनी दावोस दौऱ्यावरून कडाडून टिका केली. ठाकरे गटाचे युवा नेते आदित्य ठाकरे यांनी देखील यावरून जोरदार टिका केली. यातच आता एक खासदार ठाणे आणि कल्याण डोंबिवली महापालिकेचे आयुक्त यांच्यासोबत शासकीय दौऱ्याच्या नावाखाली नेदरलॅंड्सला गेल्याचा दावा आदित्य ठाकरे यांनी केलाय. त्यावरून पुन्हा एकदा मोठा वाद होण्याची शक्यता आहे.
हेही वाचा…“कोणाच्या आशीर्वादामुळे खासदारकी मिळाली? हे विसरलात का ?” ठाकरे गटाच्या खासदाराला भाजपचा सवाल
आदित्य ठाकरे यांनी या दौऱ्यावरून शिंदे सरकारला अनेक सवाल केले आहेत. ते म्हणाले की, गद्दार गॅंगचा आणखी एक खासदार ठाणे आणि कल्याण डोंबिवली महापालिकेच आयुक्त आणि मुंबई पालिका तसेच एमएमआरडीच्या अतिरिक्त आयुक्तांसोबत शासकीय दौऱ्याच्या नावाखाली नेदरलॅंड्स येथे पर्यटनाला गेले आहेत. या दौऱ्याबाबत अर्बन डेव्हलपमेंट डिपार्टमेंटने आपल्या इंस्टाग्रामच्या अधिकृत हॅंडलवर पोस्ट केली असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
दरम्यान, खासदारांना नगरविकास विभागासाठीच्या शिष्टमंडळाचे नेतृत्व करण्याची परवानगी महाराष्ट्र सरकार कधीपासून देऊ लागले? या शिष्टमंडळाचे नेतृत्व करण्याची संधी त्या व्यक्तिला का दिली आहे? ती व्यक्ती संबंधित विभागाच्या मंत्र्याचा मुलगा आहे म्हणून की खासदार आहे म्हणून? केंद्रीय मंत्र्याने या दौऱ्यासाठी मंजूरी दिली आहे का ? असा सवालही आदित्य ठाकरे यांनी उपस्थित केलाय.
हेही वाचा…जरांगे पाटलांचं वादळ सरकार रोखू शकणार का ? मुंबईच्या दिशेने रवाना होण्यास मराठा बांधव तयार
दरम्यान, लोकप्रतिनिधींच्या अनुपस्थितीत खासदाराला महापालिकेचे प्रशासक असलेल्या शिष्टमंडळाचे नेतृत्व करण्याची परवानगी आहे का? या सहलीचे पैसे कोणी दिलेत? महाराष्ट्र सरकार की नेदरलँड सरकारने? जर केंद्र सरकारने याला परवानगी असेल तर मग अन्य पक्षांचे खासदार मंत्र्यांऐवजी शिष्टमंडळांचे नेतृत्व करतील आणि परदेश दौरेही करतील. असा टोलाही आदित्य ठाकरे यांनी लगावला आहे.
गद्दार गँगचा आणखी एक खासदार ठाणे आणि कल्याण डोंबिवली महापालिकचे आयुक्त आणि @mybmc तसेच @mmrdaofficial च्या अतिरिक्त आयुक्तांसोबत शासकीय दौऱ्याच्या नावाखाली नेदरलँड्स येथे पर्यटनाला गेले.
• ह्या दौऱ्याबाबत अर्बन डेव्हलपमेंट डिपार्टमेंटने आपल्या इंस्टाग्रामच्या अधिकृत हँडलवर…
— Aaditya Thackeray (@AUThackeray) January 19, 2024
READ ALSO :
हेही वाचा…एकाच वेळी होणार लोकसभा अन् विधानसभेच्या निवडणुका, केंद्र सरकारकडे अहवाल तयार
हेही वाचा…“उद्धव ठाकरेंना २२ जानेवारीला काळाराम मंदिरात जाऊ देऊ नका, अन्यथा..”, भाजपने दिला इशारा, राजकारण तापणार
हेही वाचा…वंचितला महाविकास आघाडीत घेणार ? शरद पवार म्हणाले, ४८ पैकी ३५ जागांवर…
हेही वाचा…कर्माचे फळ..! राहत्या घरापासूनच शरद मोहोळच्या मारेकऱ्याची पोलिसांनी काढली धिंड, पाहा व्हिडीओ
हेही वाचा…मराठा आरक्षण घेऊनच मुंबईतून परतणार, मनोज जरांगे पाटलांची मुंबईकडे कुच