मुंबई : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटलांनी मुंबईच्या दिशेने कुच केली आहे. येत्या २६ जानेवारी रोजी मुंबईत दीड कोटी मराठे दाखल होतील, असा विश्वास मनोज जरांगे पाटलांनी व्यक्त केला आहे. मराठा वादळ मुंबईच्या दिशेने निघताच आता सरकार देखील अॅक्शन मोडवर आलं असून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली वर्षा निवास्थानी बैठक पार पडली. या बैठकीसाठी जिल्ह्यातील सर्व जिल्हाधिकारी ऑनलाईनच्या माध्यमातून हजर होते. यावेळी एकनाथ शिंदे यांनी मराठा आरक्षणासंदर्भात महत्वाच्या सूचना केल्या.
हेही वाचा…एकाच वेळी होणार लोकसभा अन् विधानसभेच्या निवडणुका, केंद्र सरकारकडे अहवाल तयार
एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली वर्षा निवासस्थानी बैठक पार पडली. या बैठकीत निवृत्त. न्या. दिलीप भोसले, निवृत्त न्या. मारोती गायकवाड, निवृत्त न्या. संदीप शिंदे, आमदार बच्चू कडू, राज्याचे महाधिवक्ता बिरेंद्र सराफ, महसूलचे अपर मुख्य सचिव राजगोपाल देवरा, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव विकास खारगे, नगरविकासचे प्रधान सचिव डॉ. के. एच. गोविंदराज, इतर मागासवर्ग विभागाच्या सचिव अंशू सिन्हा , विधी व न्याय सचिव कलोते उपस्थित होते. यावेळी गावोगावी जाऊन कुणबी नोंदी शोधा, तसेच कुणबी प्रमाणपत्राचं वाटप युद्धपातळीवर करा. वर्षा येथील बैठकीत मुख्यमंत्र्यांनी अधिकाऱ्यांना सुचना दिल्या आहेत. तसेच कुणबी नोंदी न सापडलेल्या गावात फेर तपासणी करा, असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले आहे.
हेही वाचा…“उद्धव ठाकरेंना २२ जानेवारीला काळाराम मंदिरात जाऊ देऊ नका, अन्यथा..”, भाजपने दिला इशारा, राजकारण तापणार
दरम्यान, मुंबईत येण्यापुर्वीच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे मनोज जरांगे पाटलांशी संवाद साधणार आहेत. महाराष्ट्र सरकारचे वरिष्ठ अधिकारी बच्चू कडू यांच्या संपर्कात असून जरांगे पाटील यांनी मुंबईमद्ये येऊ नये. कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण करू नये, अशी विनंती सरकारकडून जरांगे पाटलांना करण्यात येणार आहे. गिरीश महाजन, उदय सामंत, शंभूराजे देसाई आणि इतर नेत्यांचे शिष्टमंडळ जरांगे पाटलांची मुंबईत येण्यापुर्वीच भेट देखील घेणार असल्याची माहिती सुत्रांनी दिलीय.
READ ALSO :
हेही वाचा…सुप्रिया सुळेंवर केलेल्या टिकेवरून राष्ट्रवादीच्या दोन्ही गटात महाभारत, अजित पवार गटाची टिका अन् त्यावर शरद पवार गटाचं प्रत्युत्तर
हेही वाचा…“आमचा अभ्यास बुडला, तर राम लल्लाही खूश होणार नाही”, सावित्रीच्या लेकींनीं नाकारली २२ जानेवारीची सुट्टी
हेही वाचा…कथित खिचडी घोटाळ्यात शिंदे गटातील ‘हा’ नेता मोहरा, विरोधकांची कारवाई करण्याची मागणी
हेही वाचा…“मग अजित पवारांना पहिल्यांदा तिकीट कुणी दिलं ?” म्हणून शरद पवारांनी अजित पवारांना सुनावलं
हेही वाचा…“गद्दार गॅंगचा आणखी एक खासदार आयुक्तांसोबत शासकीय खर्चात नेदरलॅंडच्या पर्यटनाला”, आदित्य ठाकरेंचा घणाघात