नाशिक : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते प्रभू श्रीराम मंदिराचा प्राणप्रतिष्ठा सोहळा अयोध्येत पार पडत आहे. या सोहळ्यासाठी देशभरातून अनेक दिग्गज अयोध्येत दाखल झाले आहेत. तर दुसऱ्या बाजूला विरोधी पक्षातील अनेक नेत्यांनी अयोध्येत न जाण्याचा निर्णय घेतला आहे. यातच आज माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे काळाराम मंदिरात जाऊन महाआरती आणि दर्शन घेणार आहेत. त्यावरून भाजपचे आमदार आशिष शेलार यांनी त्यावरून काही प्रश्न उपस्थित केले आहेत.
हेही वाचा…“उद्धव ठाकरेंच्या गटात कधीच सन्मानाची वागणूक मिळाली नाही”, दापोलीतील कार्यकर्त्यांचा शिंदे गटात प्रवेश
भगवान श्रीराम काळारामासमोर आज उभे असलेल्या सन्मानीय ढोंगी रामभक्तांना थेट सवाल अस म्हणत आशिष शेलार यांनी उद्धव ठाकरे यांना डिवचण्याचा प्रयत्न केला आहे. पंढरपुरात जाऊन ज्यांनी भगवान विठ्ठलाच्या पायाला हात लावले नाहीत. ज्यांनी सार्वजनिक गणेशोत्सवाची शंभर वर्षांची परंपरा खंडित केली. लालबागच्या राजावर पण बंदी आणली. रामभक्तांच्या रक्ताने हात माखलेल्या मुलायमसिंग यादव यांच्या समाजवादी सोबत मैत्री केली. रथ यात्रा अडवणारे लालूप्रसाद यादव ज्यांच्यासाठी प्रिय व्यक्ती ठरली. राम काल्पानिक म्हणणाऱ्या कॉंग्रेस सोबत सत्तेची फळे चाखली. अशा ढोंगी भक्तांना आता काळाराम पावणार का ? असा सवाल आशिष शेलारांनी केलाय.
हेही वाचा…“जरांगे पाटलांनी मुंबईत येऊ नये, मराठा आरक्षणाचं काम अंतिम टप्प्यात,” शिंदेंच्या मंत्र्यांचं मोठं विधान
दरम्यान, आज जेव्हा देश दिवाळी साजरी करतोय तेव्हा उबाठा शाखा अंधारात आणि गोदातिरावर थयथयाट करतेय. असं म्हणत जो न रहा राम का वो न किसी काम का ? असं म्हणत आशिष शेलारांनी उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार टिका केली आहे.
भगवान श्री काळारामा समोर आज उभे असलेल्या सन्मानीय ढोंगी रामभक्तांना आमचा थेट सवाल…
◆ पंढरपूरात जाऊन ज्यांनी भगवान विठ्ठलाच्या पायाला हात लावले नाहीत
◆ज्यांनी सार्वजनिक गणेशोत्सवाची शंभर वर्षांची परंपरा खंडित केली
◆लालबागच्या राजावर पण बंदी आणली
◆रामभक्तांच्या रक्ताने…
— Adv. Ashish Shelar – ॲड. आशिष शेलार (@ShelarAshish) January 22, 2024
READ ALSO :
हेही वाचा…राहुल गांधींना मंदिरात प्रवेश नाकारला, रस्त्यावर बसून गायले ‘रघुपति राघव राजा राम पतित पावन सीताराम”
हेही वाचा…“राजकीय स्वार्थासाठी लावले रागीट श्रीरामाचे बॅनर्स”, असीम सरोदे यांचा मोठा आरोप
हेही वाचा…“मना मनांत श्रीरामचा नारा…घराघरांत करु उत्सव साजरा!” – भाजपा आमदार महेश लांडगे यांचे आवाहन
हेही वाचा…सरकारचा मोठा निर्णय ! “..म्हणून मुख्यमंत्र्यांसह दोन्ही उपमुख्यमंत्री राम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याला जाणार नाहीत”
हेही वाचा…“त्यामुळे तुम्हाला धोका निर्माण होऊ शकतो,” मुंबईत येण्याआधी रोहित पवारांनी जरांगे पाटलांना दिला मोठा सल्ला