नाशिक : अवघ्या भारतवर्षाची प्रदीर्घ काळाजी प्रतिक्षा अखेर संपली आहे. अयोध्येत श्रीराम मंदिरात प्रभू श्रीराम विराजमान झाले आहेत. हिंदू संस्कृतीनुसार सर्य म्हणजे डोळे, वायू म्हणजे कान आणि चंद्र म्हणजे मन या तिन्ही देवतांना विनंती करत अग्नि यज्ञाच्या साक्षीने अखंड मंत्रघोषात प्रभू श्रीरामाचे गाभाऱ्यात विधिवत पूजन करण्यात आलं. यावर आता ठाकरे गटाकडून पहिली प्रतिक्रिया देण्यात आली आहे. माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना २२ जानेवारीचं निमंत्रण देण्यात आलं होतं. परंतु त्यांनी नाशिक येथील काळाराम मंदिरात महाआरती करण्याचा संकल्प केला.
हेही वाचा…“अशा ढोंगी भक्तांना आता काळाराम पावणार का ?” भाजपची उद्धव ठाकरेंवर जहरी टिका
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते प्रभू श्रीराम प्राणप्रतिष्ठा सोहळा पार पडला. यावर हिंदूह्यदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचं स्वप्न अखेर पुर्ण झालं आहे. रामजन्मभूमी आंदोलनासाठी प्राणांची बाजी लावलेल्या शिवसैनिक कारसेवकांचा आम्हाला अभिमान आहे. प्रभू श्रीराम प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त तमाम रामभक्तांना मंगलमय शुभेच्छा अस ठाकरे गटाकडून सांगण्यात आलं आहे.
हेही वाचा…राहुल गांधींना मंदिरात प्रवेश नाकारला, रस्त्यावर बसून गायले ‘रघुपति राघव राजा राम पतित पावन सीताराम”
दरम्यान, ठाकरे गटाचे युवा नेते आदित्य ठाकरे यांनी देखील यावर प्रतिक्रिया दिली आहे. रघुपती राघव राजा राम, पतित पावन सिता राम! हिंदूहृदयसम्राट श्री बाळासाहेब ठाकरे ह्यांनी पाहिलेलं स्वप्नं आज पूर्ण झालं, सर्व कारसेवकांनी केलेल्या त्यागाचं आणि बलिदानाचं सोनं झालं! प्रभू श्रीरामचंद्रांचा विजय असो! जय सिया राम! असं ट्विट आदित्य ठाकरे यांनी केलं आहे.
आणि आज अखेर बाळासाहेबांचं स्वप्न पूर्ण झालं! pic.twitter.com/EwqUUwBqf4
— ShivSena – शिवसेना Uddhav Balasaheb Thackeray (@ShivSenaUBT_) January 22, 2024
रघुपती राघव राजा राम,
पतित पावन सिता राम!हिंदूहृदयसम्राट श्री बाळासाहेब ठाकरे ह्यांनी पाहिलेलं स्वप्नं आज पूर्ण झालं, सर्व कारसेवकांनी केलेल्या त्यागाचं आणि बलिदानाचं सोनं झालं!
प्रभू श्रीरामचंद्रांचा विजय असो!
जय सिया राम! pic.twitter.com/mUJZ36ajsE— Aaditya Thackeray (@AUThackeray) January 22, 2024
READ ALSO :
हेही वाचा…“आता आरक्षणातच माझा राम, मुंबई हीच अयोध्या”, किरण मानेंची पोस्ट चर्चेत
हेही वाचा“सगळे जाऊ शकतात, परंतु राहुल गांधी मंदिरात जाऊ शकत नाही,” मंदिरात जाण्यावाचून राहुल गांधींना रोखलं
हेही वाचा…“आज मी प्रभू श्रीराम यांची माफी मागतो, कारण…” नरेंद्र मोदींचं अयोध्या मंदिरात मोठं विधान
हेही वाचा…“देश प्रभू रामांच्या आगमनाच्या आंनदात असताना मुख्यमंत्र्यांच्या ठाण्यात मोठा राडा, ”अल्लाह हू अकबर” च्याही दिल्या घोषणा
हेही वाचा…“आज कारसेवकांचे आत्मे सुखावले अन् ३२ वर्षांनी शरयू नदी हसली” !