मुंबई : एका बाजूला राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळा पार पडत आहे. तर दुसऱ्या बाजूला मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील मुंबईच्या दिशेने कुच करीत आहेत. आज संपुर्ण दिवस संपुर्ण देशात राममय झाला आहे. परंतु मनोज जरांगे पाटलांचा ताफा आता मुंबईच्या दिशेने हळूहळू सरकू लागला आहे. याच पार्श्वभूमीवर ठाकरे गटात अलीकडेच प्रवेश केलेले अभिनेते किरण माने यांची फेसबुक पोस्ट प्रंचड व्हायरल होत आहे.
हेही वाचा…राहुल गांधींना मंदिरात प्रवेश नाकारला, रस्त्यावर बसून गायले ‘रघुपति राघव राजा राम पतित पावन सीताराम”
किरण माने यांनी आपल्या पोस्टमध्ये असे म्हटले आहे की, आम्ही हक्काचं आरक्षण मागतोय. बाकी कुठल्याही जातीवर अन्याय न करता ते द्या.” अशी मागणी करत लाख्खोंच्या संख्येनं मराठा समाज बाहेर पडलाय. आपल्या अधिकारासाठी संवैधानिक मार्गानं आंदोलन सुरूय. या गर्दीत माझे स्वत:चे कितीतरी नातेवाईक आहेत. आपल्या पुढच्या पिढ्यांच्या सुरक्षिततेच्या चिंतेनं त्यांना हे पाऊल उचलायला मजबूर केलंय. वयाची सत्तरी पार केलेले माझे एक नातेवाईकसुद्धा आंदोलनात हट्टाने सामील झालेत.
हेही वाचा…“राजकीय स्वार्थासाठी लावले रागीट श्रीरामाचे बॅनर्स”, असीम सरोदे यांचा मोठा आरोप
मी फोन केला, “तुमची तब्येत आम्हाला महत्त्वाची आहे. परत या. लोकांनी घरात बसुन टीव्हीवर राममंदिराचा सोहळा बघावा म्हणून सुट्टी दिलीय सगळ्यांना. नातवंडं, पाहुणे आलेत. एकत्र मिळून बघा.” ते म्हणाले, “नाही. ते बघून काय मिळनारंय? महागाई कमी हुनारंय का आपल्या पोरांना रोजगार मिळनारंय? आता आरक्षणातच माझा राम आहे. मुंबई हीच अयोध्या. नातवंडांसाठीच मी हे करतोय. आम्ही दुसर्याच्या ताटातला घास हिसकावून घेत नाही. आमचा हक्काचा आमच्या नातवंडांच्या मुखात पडायला हवा.” …
मोर्चा जिथे जिथे जातोय तिथे दलित, मुस्लिम, धनगर, माळी असा सगळा समाज पाण्यापासून खाण्याची सगळी सोय बघतोय. ग्राऊंड लेव्हलवरचा बहुजन फुटलेला नाही, हे आशादायी चित्र आहे. राजकीय चित्र काहीही दाखवूदेत. डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांची मराठा समाजाला आरक्षण देण्याची प्रचंड इच्छा होती. ते म्हणालेही होते की ‘एक दिवस मराठा समाजाला आरक्षणाची गरज भासेल, पण त्यावेळी ते द्यायला मी नसेन ! असंही किरण माने यांनी म्हटलं आहे.
READ ALSO :
हेही वाचा“सगळे जाऊ शकतात, परंतु राहुल गांधी मंदिरात जाऊ शकत नाही,” मंदिरात जाण्यावाचून राहुल गांधींना रोखलं
हेही वाचा…“आज मी प्रभू श्रीराम यांची माफी मागतो, कारण…” नरेंद्र मोदींचं अयोध्या मंदिरात मोठं विधान
हेही वाचा…“देश प्रभू रामांच्या आगमनाच्या आंनदात असताना मुख्यमंत्र्यांच्या ठाण्यात मोठा राडा, ”अल्लाह हू अकबर” च्याही दिल्या घोषणा
हेही वाचा…“आज कारसेवकांचे आत्मे सुखावले अन् ३२ वर्षांनी शरयू नदी हसली” !
हेही वाचा…“अशा ढोंगी भक्तांना आता काळाराम पावणार का ?” भाजपची उद्धव ठाकरेंवर जहरी टिका