नाशिक : रामाचे मुखवटे घालून रावण फिरत आहेत, त्यांचे मुखवटे फाडायचे आहेत. छत्रपती शिवाजी महाराज यांची बरोबरी मोदी यांच्याशी केली, हे त्रिवार नाही..छत्रपती शिवाजी महाराज जन्माला आले नसते तर राम मंदिर अस्तित्वात आले नसते..हे तेज महाराष्ट्राच्या मातीत जन्माला आले अशी टिका माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भाजपवर केली. आज नाशकात ठाकरे गटाचं राज्यव्यापी अधिवेशन सुरू आहे. त्यामध्ये ते बोलत होते. आमची ज्यांनी शिवसेना पळवली, मग त्याचा कोणीही वाली असेल, त्याचा राजकारणात वध केल्याशिवाय आम्ही स्वस्त बसणार नाही. असा इशाराही उद्धव ठाकरे यांनी भाजपला दिला.
हेही वाचा…शिंदे गटाला दापोलीत बसला मोठा हादरा, बडा नेता ठाकरे गटात दाखल
मुंबईत जेव्हा दंगली पेटल्या होत्या. तेव्हा माझे शिवसैनिकांनी तुरूंगवास, मार आणि बऱ्याच गोष्टी सहन केल्या आहेत. तेव्हा आम्ही कुणामध्येही भेदभाव केला नाही. आज सगळ्या शिवसैनिकांवर खोट्या केसस दाखल केले जाताहेत. मग तुमच्याकडील जे भ्रष्ट लोक आहेत. त्यांच्या चौकशा कधी लावणार ? असा सवाल देखील उद्धव ठाकरे यांनी भाजपला केला. ठाणे, नाशिक, नागपूर तसेच सगळ्याच महापालिकेतील घोटाळा काढा. तसेच हे सर्व काढत असाल तर पीएम केअर घोटाळ्यातीलही घोटाळा बाहेर काढा? याच्या माध्यमातून सगळा पैसा बाहेर काढा. परंतु यांच्यावर भ्रष्टचाराची बातमी आली की फक्त एकच दिवस चालते. रूग्णालयात चालवलेल्या रूग्णवाहिकेत आठ हजार कोटीचा भ्रष्टाचार करता ? असा सवाल देखील उद्धव ठाकरे यांनी केलाय.
हेही वाचा…‘जय सियाराम’चा नारा…मंगलमय पिंपरी-चिंचवड…अन् पाच लाखाहून अधिक रामभक्तांची रथयात्रा!
दरम्यान, संयुक्त महाराष्ट्राची समिती जनसंघाचे फोडली.. स्वातंत्र्य चळवळीत जनसंघाचे भाग घेतला नाही.. काँग्रेस नको म्हणून श्यामा प्रसाद मुखर्जी यांनी मुस्लिम लीग बरोबर सरकार स्थापन केले होते..त्यांच्या बद्दल बोला… तुम्ही आम्हाला हिंदुत्व शिकवता? असा सवालही ठाकरेंनी केला. तसेच तीस वर्ष भाजप बरोबर राहून निर्लज्ज झालो नाही तर काँग्रेस बरोबर राहून काय काँग्रेस काय होणार असा टोलाही ठाकरेंनी भाजपला लगावला.
READ ALSO :
हेही वाचा…“प्रभू श्रीरामांची ‘ती’ संयमी योद्धा ही उपाधी आता उद्धव ठाकरेंना शोभून दिसतेय,”
हेही वाचा…“घाबरू नका, आजही बाप माणूस माझ्यापाठीमागे ढाल बनून उभा आहे”, Ed च्या चौकशीआधी रोहित पवारांचं कार्यकर्त्यांना आवाहन
हेही वाचा…“मुंबईत मराठ्यांना हात लावण्याचा प्रयत्न केला तर संपुर्ण महाराष्ट्रात….” जरांगे पाटलांनी सरकारला दिला पुन्हा इशारा
हेही वाचा…“आज तुमचे शब्द फिरलेत, उद्या यांची डोकी फिरली की तुमची..,” शरद पवार गटाने सुनील तटकरेंना दिला इशारा
हेही वाचा….कॉंग्रेसच्या माजी खासदारांचं पक्षातून निलंबन, भाजपमध्ये प्रवेश, पुढील लोकसभेत रक्षा खडसेंचा पत्ता कट ?