पुणे : राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांची उद्या ईडी चौकशी होणार आहे. रोहित पवार यांची बारामती अॅग्रो कंपनी गेल्या काही दिवसापासून ईडीच्या रडारवर आली आहे. यासंदर्भात ईडीने रोहित पवार यांना चौकशीसाठी समन्स बजावले होते. त्याच अनुषंगाने उद्या इडीच्या कार्यालयात चौकशी होणार असून शरद पवार संपुर्ण दिवशभर पक्ष कार्यालयात बसून राहणार आहे. याच पार्श्वभूमीवर रोहित पवारांनी मोठं वक्तव्य केलं आहे.
हेही वाचा…शिंदे गटाला दापोलीत बसला मोठा हादरा, बडा नेता ठाकरे गटात दाखल
रोहित पवारांनी असं म्हटलंय की, ED कार्यालयात उद्या बुधवार दि. २४ जानेवारी चौकशीसाठी गेल्यानंतर यापूर्वी जसं सहकार्य केलं तसंच आताही अधिकाऱ्यांना पूर्ण सहकार्य करणार आहे. मात्र सध्याचं सुडाचं राजकारण बघता सर्वच यंत्रणांवर सरकारचा प्रचंड दबाव असल्याने याच दबावाखाली माझ्याबाबत ED ने काही चुकीची कारवाई केली तर कुणीही घाबरून जाऊ नये उलट आदरणीय पवार साहेबांसोबत आणि महाराष्ट्राचा स्वाभिमान जपणाऱ्या व संविधानावर विश्वास असलेल्या प्रत्येक व्यक्तीसोबत सर्वांनी एकजुटीने उभं रहावं. कारण आपल्याला कुणापुढंही न झुकता महाराष्ट्राचा स्वाभिमानी बाणा टिकवायचाय आणि महाराष्ट्र धर्म जपायचाय. असं आवाहन रोहित पवारांनी आपल्या कार्यकर्त्यांना म्हटलं आहे.
हेही वाचा…‘जय सियाराम’चा नारा…मंगलमय पिंपरी-चिंचवड…अन् पाच लाखाहून अधिक रामभक्तांची रथयात्रा!
दरम्यान, माझ्या कुटुंबासाठी आणि कोवळ्या वयातील मुलांसाठी तर हे घाणेरडं राजकारण न समजण्याच्या पलीकडचं आहे. पण तरीही सर्वजण खंबीरपणे माझ्यासोबत आहेत. शिवाय उद्या सुप्रियाताई आणि स्वतः आदरणीय पवार साहेबही येत आहेत. वय झालं म्हणून काय झालं? वय झालेली माणसं तरुणांना संधीही देतात आणि प्रसंगी बाप माणूस म्हणून ढाल बनून उभीही राहतात. माझ्यासाठी तर हे भारावणारं आहे. या वयातही महाराष्ट्राचा हा सह्याद्री कणखरपणे पाठीशी उभा राहत असेल तर आणखी काय हवंय. असंही रोहित पवारांनी म्हटलं आहे.
#ED कार्यालयात उद्या (बुधवार दि. २४ जानेवारी) चौकशीसाठी गेल्यानंतर यापूर्वी जसं सहकार्य केलं तसंच आताही अधिकाऱ्यांना पूर्ण सहकार्य करणार आहे. मात्र सध्याचं सुडाचं राजकारण बघता सर्वच यंत्रणांवर सरकारचा प्रचंड दबाव असल्याने याच दबावाखाली माझ्याबाबत #ED ने काही चुकीची कारवाई केली तर… pic.twitter.com/29d8ILhHNB
— Rohit Pawar (@RRPSpeaks) January 23, 2024
READ ALSO :
हेही वाचा…“देशात शिवसेना नसती तर अयोध्येत प्राणप्रतिष्ठा झालीच नसती”
हेही वाचा…*उद्धव ठाकरेंची आज नाशकात तोफ धडाडणार, कुणावर हल्लाबोल, कुणावर प्रहार ?*
हेही वाचा…“मुंबईत मराठ्यांना हात लावण्याचा प्रयत्न केला तर संपुर्ण महाराष्ट्रात….” जरांगे पाटलांनी सरकारला दिला पुन्हा इशारा
हेही वाचा…“आज तुमचे शब्द फिरलेत, उद्या यांची डोकी फिरली की तुमची..,” शरद पवार गटाने सुनील तटकरेंना दिला इशारा
हेही वाचा….कॉंग्रेसच्या माजी खासदारांचं पक्षातून निलंबन, भाजपमध्ये प्रवेश, पुढील लोकसभेत रक्षा खडसेंचा पत्ता कट ?