नाशिक : हिंदुह्यदयसम्राट, शिवसेनाप्रमुख स्व. बाळासाहेब ठाकरे यांची आज जयंती असून आज ठाकरे गटाचा राज्यव्यापी मेळावा आयोजित करण्यात आला आहे. माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत आज नाशिकच्या सातपूर परिसरातील डेमोक्रोसी हॉलमध्ये हा अधिवेशन पार पडणार आहे. या अधिवेशनाला ठाकरे गटाचे सर्व खासदार आणि आमदार उपस्थित राहणार आहेत. अधिवेशनानंतर संध्याकाळी उद्धव ठाकरे यांची जाहीर सभा पार पडणार आहे.
हेही वाचा…राम मंदिर सोहळ्याच्या व्यासपीठावर शिवाजी महाराजांचा चुकीचा इतिहास, मोदींच्या समोरच महाराजांचा अपमान
उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत आज दहा वाजता ठाकरे गटाच्या अधिवेशनाला सुरूवात होणार आहे. या अधिवेशनात एकूण दहा ठराव मंजूर केले जाणार आहेत. तसेच ठाकरे गटातील विविध नेत्यांची भाषणं देखील होणार आहे. तर नाशिकच्या त्र्यंबक रोडवरील हुतात्मा अनंत कान्हेरे मैदानावर आज सांयकाळी उद्धव ठाकरे यांची तोफ धडाडणार आहे.
हेही वाचा…राम मंदिराच्या सोहळ्यापुर्वी दोन गटात मोठा राडा, श्रीरामाचे झेंडे असलेल्या गाड्या फोडल्या, गृहमंत्रालय अॅक्शन मोडवर
दरम्यान, उद्धव ठाकरे यांच्या सभास्थळी ७० बाय ४० फुट आकाराच्या मुख्य स्टेजची उभारणी करण्यात आली आहे. स्टेज समोरील भागात विशेष २ हजार निमंत्रित व्यक्तींसाठी बसण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. सभेसाठी जवळपास ७० ते ८० हजार लोक येण्याचा अंदाज आहे. या अगोदर १९९४ साली याचा मैदानावर बाळासाहेब ठाकरे यांची सभा झाली होती. तर १९९४ साली दार उघड, बये दार उघड अशी साद घालण्यात आली. याचा परिणीती म्हणून १९९५ साली १९९५ साली राज्यात आली होती.
READ ALSO :
हेही वाचा…“मुंबईत मराठ्यांना हात लावण्याचा प्रयत्न केला तर संपुर्ण महाराष्ट्रात….” जरांगे पाटलांनी सरकारला दिला पुन्हा इशारा
हेही वाचा…“आज तुमचे शब्द फिरलेत, उद्या यांची डोकी फिरली की तुमची..,” शरद पवार गटाने सुनील तटकरेंना दिला इशारा
हेही वाचा….कॉंग्रेसच्या माजी खासदारांचं पक्षातून निलंबन, भाजपमध्ये प्रवेश, पुढील लोकसभेत रक्षा खडसेंचा पत्ता कट ?
हेही वाचा…शिंदे गटाला दापोलीत बसला मोठा हादरा, बडा नेता ठाकरे गटात दाखल
हेही वाचा…‘जय सियाराम’चा नारा…मंगलमय पिंपरी-चिंचवड…अन् पाच लाखाहून अधिक रामभक्तांची रथयात्रा!