मुंबई : राष्ट्रवादी कुणाची असा युक्तिवाद सुरू असताना अजित पवारांच्या प्रतिज्ञापत्रात शरद पवारांचा उल्लेख हुकूमशाह करण्यात आला. शरद पवार पक्षात हुकूमशाही करायचे असा युक्तिवाद सुनील तटकरे यांनी आपल्या प्रतिज्ञापत्रात केलाय. शिवसेना पक्षाचा निकाल अलिकडेच लागला आहे. परंतु राष्ट्रवादी संदर्भातील निकाल अद्यापही कोर्टात आणि निवडणुक आयोगात प्रलंबित आहे. यावरूनच आता राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून अजित पवार गटाच्या नेत्यांना डिवचण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे.
हेही वाचा….अखेर प्रभू श्रीराम अयोध्या मंदिरात विराजमान..! उद्धव ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया म्हणाले….
अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांचे काही व्हिडीओ शरद पवार गटाने पोस्ट केले आहेत. त्यामध्ये शरद पवारांनी आतापर्यंत सुनील तटकरे यांना पक्षात कोण कोणती संधी दिली ? याचा उल्लेख करण्यात आला आहे. यातच शरद पवारांबाबत असलेली तेव्हाची भूमिका आणि सत्तेत सामील झाल्यानंतरची भूमिका असा दाखवण्याचा प्रयत्न शरद पवार गटाकडून करण्यात आला आहे.
हेही वाचा…“आता आरक्षणातच माझा राम, मुंबई हीच अयोध्या”, किरण मानेंची पोस्ट चर्चेत
यातच त्यांनी ट्विट केलेल्या व्हिडीओच्या खाली असे म्हटले आहे की, सत्तेचे गुलाम ही म्हण आजवर महाराष्ट्राने ऐकली होती, वाचली होती पण आज प्रत्यक्षात अनुभव आला. ज्यांनी तुम्हाला पक्षात घेतलं ते आदरणीय पवार साहेब, ज्यांनी तुम्हाला बहुमत नसताना पद दिलं ते आदरणीय पवार साहेब, ज्यांनी तुमच्यावर होणाऱ्या आरोपांची टिकेची पर्वा न करता तुमची साथ दिली, तुमच्या पाठीशी उभे राहिले ते आदरणीय पवार साहेब आज तुमच्यासाठी हुकूमशहा झालेत?? तटकरे साहेब ह्याच सत्ताधारी पक्षाच्या लोकांच्या तोंडी तेंव्हा तुम्हाला तुरुंगात डांबण्याची भाषा होती हे लक्षात असू द्यात! आज तुमचे शब्द फिरलेत, उद्या ह्यांची डोकी फिरली की तुमची ही गरज संपेल हे लक्षात असू द्यात. असा इशाराही शरद पवार गटाने सुनील तटकरे यांना दिलाय.
सत्तेचे गुलाम ही म्हण आजवर महाराष्ट्राने ऐकली होती, वाचली होती पण आज प्रत्यक्षात अनुभव आला.
ज्यांनी तुम्हाला पक्षात घेतलं ते आदरणीय पवार साहेब, ज्यांनी तुम्हाला बहुमत नसताना पद दिलं ते आदरणीय पवार साहेब, ज्यांनी तुमच्यावर होणाऱ्या आरोपांची टिकेची पर्वा न करता तुमची साथ दिली,… pic.twitter.com/PHgWhWxrWt— NCP (@NCPspeaks) January 23, 2024
READ ALSO :
हेही वाचा….कॉंग्रेसच्या माजी खासदारांचं पक्षातून निलंबन, भाजपमध्ये प्रवेश, पुढील लोकसभेत रक्षा खडसेंचा पत्ता कट ?
हेही वाचा…शिंदे गटाला दापोलीत बसला मोठा हादरा, बडा नेता ठाकरे गटात दाखल
हेही वाचा…‘जय सियाराम’चा नारा…मंगलमय पिंपरी-चिंचवड…अन् पाच लाखाहून अधिक रामभक्तांची रथयात्रा!
हेही वाचा…राम मंदिर सोहळ्याच्या व्यासपीठावर शिवाजी महाराजांचा चुकीचा इतिहास, मोदींच्या समोरच महाराजांचा अपमान
हेही वाचा…राम मंदिराच्या सोहळ्यापुर्वी दोन गटात मोठा राडा, श्रीरामाचे झेंडे असलेल्या गाड्या फोडल्या, गृहमंत्रालय अॅक्शन मोडवर