पुणे : आगामी लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पुण्यात कॉंग्रेसची पश्चिम महाराष्ट्र संघटनात्मक बैठक घेण्यात आली. या बैठकीसाठी नाना पटोले, पृथ्वीराज चव्हाण, सुशीलकुमार शिंदे यांची प्रमुख उपस्थिती होती. या बैठकीत पश्चिम महाराष्ट्रातील लोकसभा मतदारसंघाचा आढावा घेण्यात आला. त्यानंतर पत्रकार परिषद पार पडली. यावेळी पृथ्वीराज चव्हाण यांना साताऱ्याची लोकसभा निवडणुक लढवणार का ? असा सवाल करण्यात आला.
हेही वाचा…“30 वर्ष भाजप बरोबर राहून निर्लज्ज झालो नाही तर काँग्रेसबरोबर राहून काय काँग्रेस होणार”? उद्धव ठाकरेंचा भाजपला टोला
पुण्यातील कॉंग्रेस भवन येथे आज पश्चिम महाराष्ट्र संघटनात्मक बैठक पार पडली. या बैठकीसाठी महाराष्ट्र राज्याचे प्रभारी रमेश चेन्निथला यांना पृथ्वीराच चव्हाण हे साताऱ्यातून इच्छूक आहेत. असे समजते किंवा ते पुण्यातून लोकसभा निवडणूक लढवणार का ? असं विचारलं असता मंचावर उपस्थित असलेल्या पृथ्वीराज चव्हाण यांनी हात जोडले. त्यावर महाराष्ट्र राज्याचे प्रभारी रमेश चेन्निथला यांनी मी पृथ्वीराज चव्हाण महाराष्ट्रातून कुठून उभे राहिले तर ते निवडून येतील असे उत्तर दिले.
हेही वाचा…“प्रभू श्रीरामांची ‘ती’ संयमी योद्धा ही उपाधी आता उद्धव ठाकरेंना शोभून दिसतेय,”
दरम्यान, सध्या सातारा लोकसभेत विद्यमान खासदार भाजपचे उदयनराजे भोसले आहेत. २०१९ साली झालेल्या लोकसभा निवडणुकीत त्यांनी राष्ट्रवादीच्या तिकिटावर निवडणुक लढविली होती. परंतु त्याआधी त्यांनी भाजपमध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतला. यावर आता अजित पवार गटाकडून सातारा लोकसभा मतदारसंघावर दावा सांगितला जात आहे. परंतु भाजप ही जागा सोडण्याच्या तयारीत दिसत नाही असे यावरून स्पष्ट दिसत आहे.
READ ALSO :
हेही वाचा…“धनंजय मुंडे यांच्यावर कठोर कारवाई करा, पुरावे आम्ही देतो,” शरद पवार गटाने कसली कंबर
हेही वाचा…“ज्यांच्या विरोधात निवडणुक लढविली, आता त्यांनाच उमेदवारी देण्याचा भाजपचा नवा डाव”
हेही वाचा…उल्हास पाटिल सहा वर्षासाठी पक्षातून निलंबीत, माजी खासदार उल्हास पाटलांची पहिली प्रतिक्रिया.. म्हणाले..
हेही वाचा…“पक्ष फुटीनंतर राष्ट्रवादी निवडणुकीचे कागदपत्र कपाटातून गायब”, शरद पवार गटाचा मोठा आरोप
हेही वाचा…नितेश राणेंच चिथावणीखोर ट्विट अन् मीरा रोडवर वाढवला पोलिसांचा मोठा फौजफाटा