नाशिक : परभणीमध्ये आज शिवसेना खासदार संजय जाधव यांच्या खळबळजनक वक्तव्याने, राष्ट्रवादी-शिवसेनमधील दरी समोर आली. दरम्यान यालाच अधोरेखित करणारी अजून एक घटना नाशिक मध्ये घडली असून, नाशिक उड्डाणपुलाच्या उदघाटन कार्यक्रमावरून राष्ट्रवादी नेते आणि मंत्री छगन भुजबळ हे शिवसेना खासदार हेमंत गोडसेंवर नाराज असल्याची चर्चा सुरु झाली आहे. या पुलाच्या उदघाटनाचे निमंत्रण भुजबळ यांना नसल्याने त्यांची ही नाराजी असल्याचे सांगितले जात आहे.
ठाकरे सरकारला आरक्षण द्यायचचं नाहीये, त्यामुळे वेळकाढूपणा चालू आहे – देवेंद्र फडणवीस
दरम्यान, यावर छगन भुजबळ यांनी, “मुख्यमंत्री सोमवारी नाशिकमध्ये आहेत. त्यांच्या हस्तेही उड्डाणपुलाच्या उद्घाटनाची लाल फित कापता आली असती. त्यामुळे, इतकी घाई का केली माहित नाही. मुळात हा उदघाटन सोहळा केंद्रीय मंत्री नितिन गडकरी आणि तर अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत व्हायला हवा होता. कालच्या कार्यक्रमाला गर्दीही खूप केली गेली होती” अशी प्रतिक्रिया देत नाराजी व्यक्त केली आहे.
अजित पवारांचे दोन स्वीय सहाय्यक, खास पुणेकरांच्या समस्या सोडवण्यासाठी राष्ट्रवादी भवनात बसणार
रविवारी नाशिकमध्ये खासदार हेमंत गोडसेंच्या हस्ते नाशिक उड्डाणपुलाचे उदघाटन करण्यात आले. या कार्यक्रमाला शिवसेनेच्या स्थानिक नेते मंडळींची आणि कार्यकर्त्यांनी तूफान गर्दी होती. यावेळी गोडसेंसह अनेकांच्या चेहऱ्यावर मास्कही नव्हता. तसेच, काल वरुण सरदेसाई यांच्याही कार्यक्रमाला गर्दी झाल्याचे चित्र पाहायला मिळाले. त्यामुळे, कोरोनाचे सर्व नियम धाब्यावर बसवून शिवसेना नेतेच मुख्यमंत्र्यांच्या आदेशाला केराची टोपली दाखवून देत असल्याचे दिसत आहे.
सार्वजनिक गणेशोत्सवाला सरकारच्या उदासीनतेचा फटका – आशिष शेलार
दुसरीकडे, याबाबत शिवसेना खासदार हेमंत गोडसे यांना विचारले असता, “उत्साहाच्या भरात कार्यकर्त्यांची गर्दी झाली असं अफलातून उत्तर त्यांनी दिलं आहे. दरम्यान, रविवार पासून हा उड्डाणपूल वाहतुकीसाठी खुला करण्यात आला आहे. शहरातील वाहतूक कोंडी सोडवण्याकरिता के के वाघ कॉलेज ते जत्रा हॉटेल दरम्यान हा २.६ किमी उड्डाणपुल तयार करण्यात असून, त्यासाठी जवळपास ४५७ कोटी रुपये खर्च करण्यात आले आहेत.
Read Also :
- संजय जाधवांच्या विधानावर भाजपाने दिली प्रतिक्रिया, “तुम्ही काहीही करा पण…”
- अविनाश भोसलेंना ईडीचा दणका, पुण्यातील तब्ब्ल ४ कोटींच्या संपत्तीवर आणली टाच
- मुख्यमंत्र्यांचे एकच धोरण, सगळं केंद्राने करावं, द्याव; मी घरात बसणार किंवा मर्सिडीज चालवणार
- “लक्षात ठेवा! राष्ट्रवादीला आम्ही कधीही बुडवू”, शिवसेना नेत्याचे खळबळजनक विधान
- मुंबईची लोकल रेल्वे भाजपाची नोकर आहे का? संजय राऊतांचा रावसाहेब दानवेंना प्रश्न