मुंबई : नवनीत राणा यांच्या मध्ये थोडी जरी नैतिकता शिल्लक असेल तर त्यांनी आता खासदारकीचा राजीनामा द्यावा आणि अभिनय क्षेत्रात पुन्हा नशीब आजमावून पाहावं, अशी खोचक टीका राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्ष रुपाली चाकणकर यांनी खासदार नवनीत राणा यांच्यावर केली आहे.
युवा स्वाभिमान पक्षाच्या नेत्या आणि अमरावतीच्या अपक्ष खासदार नवनीत राणा यांचं जात प्रमाणपत्र उच्च न्यायालयाने रद्द केलं आहे. तसेच, त्यांना 2 लाख रुपयांचा दंड देखील ठोठावला आहे. यामुळे नवनीत राणा यांची खासदारकी धोक्यात आली आहे. यावरूनच रुपाली चाकणकर यांनी राणा यांच्यावर निशाणा साधला.
नवनीत राणा यांच्या मध्ये थोडी जरी नैतिकता शिल्लक असेल तर त्यांनी आता खासदारकीचा राजीनामा द्यावा आणि अभिनय क्षेत्रात पुन्हा नशीब आजमावून पाहावं. pic.twitter.com/9sebS16kX4
— Rupali Chakankar (@ChakankarSpeaks) June 8, 2021
अमरावती लोकसभा मतदारसंघ हा अनुसूचित जातीसाठी राखीव आहे. पण नवनीत राणा यांनी खोटे जातीचे प्रमाणपत्र सादर करून खासदारकी जिंकली. आज उच्च न्यायालयाने यावर जातीचे प्रमाणपत्र खोटे असल्याचा निकाल दिला आहे. खरतरं रिल लाईफ आणि रिअल लाईफमध्ये फरक आहे, असा टोला रुपाली चाकणकर यांनी लगावला आहे.
अभिनय क्षेत्रात तुम्हाला एखादा सीन रिटेक करता येईल. पण अमरावती जनता पुन्हा तुम्हाला रिटेकची संधी देणार नाही. कारण आपण अमरावतीच्या लाखो मतदारांचा अपमान केला आहे. तसेच राज्यघटनेचा देखील अपमान केला आहे. त्यामुळे थोडी जरी नैतिकता शिल्लक असेल तर आपण आता खासदारकीचा राजीनामा द्यावा आणि अभिनय क्षेत्रात पुन्हा नशीब आजमावून पाहावं, असा सल्ला चाकणकरांनी दिला आहे.
Read Also :