मुंबई : शिवसेना नेत्या दिपाली सय्यद आणि भाजपमध्ये सध्या जोरदार खडाजंगी बघायला मिळत आहे. दिपाली सय्यद यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांच्याबद्दल वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. त्यानंतर आता भाजपच्या महिला मोर्च्याच्या प्रदेशाध्यक्ष उमा खापरे यांनी दिपाली सय्यद यांना घरात घुसून मारण्याचा इशारा दिला आहे. आता याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काॅंग्रेसच्या नेत्या रूपाली पाटील यांनी भाजपला जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे.
“चौंडी ही पवारांच्या बापाची जहागिरी नाही”; सदाभाऊ खोतांचा शरद पवारांविरोधात एल्गार
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबाबत वादग्रस्त वक्तव्य केल्याप्रकरणी भाजपच्या नेत्या उमा खापरे यांनी दिपाली सय्यद यांना घरात घूसून मारण्याचा इशारा दिला आहे. तसेच त्यांनी दिपाली सय्यद यांच्याविरोधात गुन्हा नोंद करण्याची देखील मागणी केेली आहे. त्यामुळे मागील काही आठवड्यापासून मुंबईतील राजकीय वातावरण चांगलचं तापलेलं दिसून आलं आहे. यावर आता रूपाली पाटील यांनी हल्लाबोल केला आहे.
रूपाली पाटील म्हणाल्या की, दीपाली ताई सय्यद ,तुम्हाला घरात घुसून मारण्याची धमकी देणाऱ्यांना ते आल्यावर पळून पळून मारायचे बरं, यांचा तो बाळ्या, लोकांचे ते कार्टे ही भूमिका नाही चालणार. भाजप भगिनींनो रावणाच्या बहिणीने अन्याय केला म्हणूनच कैकईचे नाक कापले होतेच की तसेच यांना पळून पळून मारायचे. अशी खोचक टिप्पणी रूपाली पाटील यांनी केली आहे.
अन् केंद्रीय मंत्र्यांनीच स्वत: च्या मुलाचा केला सत्कार; भावुक होऊन व्यासपीठावरच ढसाढसा रडले
दरम्यान, शिवसेना नेत्या दीपाली सय्यद यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना उद्देशून ‘तुच्या” असे संबोधले आहे. आपल्या देशाचे नेतृत्व करणाऱ्या पंतप्रधानांविषयी असे बदनामीकारक विधान करणे हा एक गंभीर स्वरूपाचा व दंडनीय गुन्हा आहे. आपल्या पक्षाच्या नेत्याकडून देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर अर्वाच्च भाषेमध्ये व्यक्तव्य करण्यात येत आहेत. एक राजकीय पक्ष म्हणून देशाच्या किंवा राज्याच्या प्रमुख पदावर प्रतिनिधित्व करणाऱ्या व्यक्तीवर शिवराळ भाषेत संबोधन करणे ही आपल्या देशाची संस्कृती नाही. आपल्या पक्षाकडून होत असलेल्या अश्या कृत्यांमुळे राजकीय संस्कृती लयाला चाललेली आहे. आपण पक्ष प्रमुख म्हणून अशा नेत्यांवर त्वरित पक्षांतर्गत कारवाई करून त्यांचा पायउतार करावा. तसेच दिपाली सय्यद यांच्यावर तातडीने कारवाई करण्यात यावी, अस उमा खापरे यांनी म्हटलं आहे.
Read also:
- “बैलगाडा शर्यती अखंडित सुरू राहण्यासाठी जीवाची बाजी लावू,पण शर्यत कदापि बंद होवू देणार नाही”
- “बैल काही एकटा येत नाही, जोडीने येतो, ते पण नांगरसकट”; बैलगाडा शर्यतीत फडणवीसांचा हुंकार
- राज्यसभा उमेवारीवरून कॉंग्रेसमध्ये नाराजीनाट्य..कॉंग्रेस सरचिटणीसांनीच दिला राजीनामा
- “तुमच्या आमदाराने याठिकाणी खुप चांगलं काम केलंय”; शरद पवारांकडून रोहित पवारांचं कौतुक
- राजकारणात हातखंड असणाऱ्या वडिलांच्या छत्रछायेत वाढलेल्या राजकीय लेकींची मुख्यमंत्रीपदाची महत्वाकांक्षा पूर्ण होईल का?