अहमदनगर : राष्ट्रवादी काॅंग्रेसचे आमदार रोहित पवार यांच्या पुढाकाराने अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. यावेळी अहिल्यादेवी होळकर यांचे 9 वशंज असलेले राम शिंदे आणि भाजप नेते गोपीचंद पडळकर यांना आमंत्रित करण्यात आले नाही. त्यामुळे त्यांनी आक्रमक भुमिका घेत चौंडीकडे रवाना झाले. मात्र सदाभाऊ खोत आणि गोपीचंद पडळकर यांना पोलिसांनी अर्ध्या रस्त्यात अडवलं. त्यावरून आता सदाभाऊ खोत यांनी शरद पवारांवर जोरदार निशाणा साधला.
आज अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमीत्त चौंडी येथे त्यांच्या जन्मगावी दर्शनाला जात असताना पोलिसांनाकडून सदाभाऊ खोत व गोपीचंद पडळकर यांना चौंडी येथे जाण्यापासून अडवण्यात आले. त्यावरुन चौंडी ही पवारांच्या बापाची जहागिरी नाही. आम्हाला दर्शन घेण्यावर बंदी असू शकत नाही. मग ही लोकं आम्हाला दर्शन करण्यापासून कसे रोखू शकतात. अहिल्यादेवी होळकर ह्यांचं जन्मस्थळ ही कुणाच्या बापाची जहागीर नाही. आम्ही प्रवेश करणारच ! हे समाज कंटक राजकारणी आम्हाला का अडवत आहेत हे जनतेला ठाऊक आहे. असंही सदाभाऊ खोत म्हणाले.
पेडणेकरांचा लुडो खेळताना फोटो व्हायरल; निलेश राणे म्हणाले, ”मुंबईकरांनो तुमचे प्रश्न आता..;”
पोलीस तूम्हाला दुपारी दर्शनास येण्यासाठी सांगत होते. देवेंद्र फडणवीस साहेब हे पण महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते ते पण पंढरीच्या पांडुरंगाची पूजा करायला जात असत पण त्यांनी कधीही वारकऱ्याला सांगितले नाही की तुम्ही आत येऊ नका आता तुमच्यासाठी प्रवेशबंदी आहे. चौंडी ही पवारांचा बापाची जहागिरी नाही. त्यामुळे आम्ही दर्शन करणाच असा इशाराही सदाभाऊ खोतांनी दिला आहे.
“शेतकऱ्यांना दोन पैसे जास्त मिळू लागले की केंद्र सरकारला ते पहावत नाही”; शरद पवार
दरम्यान, अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीदिनी गोपीचंद पडळकर यांना येऊ न दिल्यामुळे त्यांनी अहिल्यादेवींच्या पुतळ्याला दुग्धाभिषेक केला. तसेच हिंदू संस्कृती व मंदिरांचा जीर्णोद्धार करणाऱ्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी यांच्या पुतळ्याला मुंबई स्फोटात मृत्यूमुखी पावलेल्या हिंदूच्या रक्ताने माखलेले हात लागले होते. त्यामुळे या पुतळ्याला दुग्धाभिषेक करून आम्ही पुण्यश्लोक अहिल्यादेवींना मानवंदना दिली. यळकोट यळकोट जय मल्हार, असंही म्हणत त्यांनी शरद पवार यांच्यावर निशाणा साधला आहे.
Read also:
- मुंबई वॉर्डनिहाय आरक्षण जाहीर; शिवसेनेच्या महत्वाच्या नेत्यांनी वॉर्ड गमवला, भाजपला फायदा
- केंद्राच्या योजनांमध्ये राज्याचा मोठा वाटा; राज्याच्या नियोजनबद्ध अंमलबजावणीने योजना सर्वदूर पोहचल्या – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
- “फडणवीससाहेब तुमच्या दोन्ही चेल्याचपाट्याना आवरा; एकाला तुकडा मिळलाय दुसरा वणवण फिरतोय”
- राष्ट्रवादीला सेनेचा मुख्यमंत्री नको की सेनेला राष्ट्रवादीचा मुख्यमंत्री नको? महाविकासआघाडीत नवी वादाची ठिणगी?
- “दिपाली सय्यद यांच्यावर त्वरीत कारवाई करून त्यांचा पायउतार करावा”; भाजपचं महिला आयोगाला पत्र