मुंबई : शिवसेना नेत्या दिपाली सय्यद आणि भाजपमध्ये सध्या जोरदार खडाजंगी बघायला मिळत आहे. दिपाली सय्यद यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांच्याबद्दल वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. त्यानंतर आता भाजपच्या महिला मोर्च्याच्या प्रदेशाध्यक्ष उमा खापरे यांनी यासंदर्भात महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांना पत्र पाठवलं आहे. तसेच दिपाली सय्यद यांना घरात घुसून मारू असा इशाराही त्यांनी दिला होता.
आघाडी अन् इतर अपक्ष सदस्यांची मतांचा हिशोब केला तर..; प्रफुल पटेलांनी सांगितलं विजयाचं सुत्र
भाजप नेत्या उमा खापरे यांनी महिला आयोगाला पाठवलेल्या पत्रात असं म्हटलं आहे की, शिवसेना नेत्या दिपाली सय्यद यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून 26 मे 2022 रोजी व्हिडियो द्वारे देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विषयी अर्वाच्च आणि गलिच्छ शब्दांत वक्तव्य केले आहे. या वक्तव्यामुळे देशाच्या पंतप्रधानांच्या प्रतीची तसेच देशाची बदनामी होत आहे. भारताचे नागरिक म्हणून आमच्या भावना तीव्र दुखावल्या गेल्या आहेत.
भाजपने वाढविली शिवसेनेची डोकेदुखी; महाडिकांना विजयासाठी लागणाऱ्या १० मतांची झाली तडजोड
शिवसेना नेत्या दीपाली सय्यद यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना उद्देशून ‘तुच्या” असे संबोधले आहे. आपल्या देशाचे नेतृत्व करणाऱ्या पंतप्रधानांविषयी असे बदनामीकारक विधान करणे हा एक गंभीर स्वरूपाचा व दंडनीय गुन्हा आहे. आपल्या पक्षाच्या नेत्याकडून देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर अर्वाच्च भाषेमध्ये व्यक्तव्य करण्यात येत आहेत. एक राजकीय पक्ष म्हणून देशाच्या किंवा राज्याच्या प्रमुख पदावर प्रतिनिधित्व करणाऱ्या व्यक्तीवर शिवराळ भाषेत संबोधन करणे ही आपल्या देशाची संस्कृती नाही. आपल्या पक्षाकडून होत असलेल्या अश्या कृत्यांमुळे राजकीय संस्कृती लयाला चाललेली आहे. आपण पक्ष प्रमुख म्हणून अशा नेत्यांवर त्वरित पक्षांतर्गत कारवाई करून त्यांचा पायउतार करावा. तसेच दिपाली सय्यद यांच्यावर तातडीने कारवाई करण्यात यावी, असंही ते म्हणाले.
भाजप राज्यसभेच्या निवडणुकीतून तिसरा उमेदवार काढून घेणार ; जयंत पाटील
दरम्यान, सुप्रिया सुळे यांच्याबाबत चंद्रकांत पाटील यांनी मसणात जा अशा पद्धतीचं वक्तव्य केलं होतं. त्यानंतर दिपाली सय्यद यांनी महागाईवरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना त्याच भाषेत त्यांनी वक्तव्य केलं. त्यानंतर आता भाजपने दिपाली सय्यद यांच्या विरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे.
Read also:
- “25 वर्ष सेनेचा मुख्यमंत्री, तर राष्ट्रवादीसाठी सुप्रिया सुळे यांचं नवस, मग काॅंग्रेस काय फक्त सतरंज्या उचलणार?”
- पेडणेकरांचा लुडो खेळताना फोटो व्हायरल; निलेश राणे म्हणाले, ”मुंबईकरांनो तुमचे प्रश्न आता..;”
- “शेतकऱ्यांना दोन पैसे जास्त मिळू लागले की केंद्र सरकारला ते पहावत नाही”; शरद पवार
- आघाडीत बिघाडी होण्याची शक्यता; काॅंग्रेस शिर्डीतील अधिवेशनात राजकीय बॉम्ब फोडणार
- अन् केंद्रीय मंत्र्यांनीच स्वत: च्या मुलाचा केला सत्कार; भावुक होऊन व्यासपीठावरच ढसाढसा रडले