मुंबई : शिवसेना आणि भाजप यांच्यातील राजकीय संघर्ष सगळ्यांनाच माहिती आहे. दोन्ही बाजूंचे नेते एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करण्याची एकही संधी सोडत नाही. अशातच मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांचा एक फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असून त्यावर भाजपनेते निलेश राणे यांनी खोचक टोला किशोरी पेडणेकर यांना लगावला आहे.
भाजप राज्यसभेच्या निवडणुकीतून तिसरा उमेदवार काढून घेणार ; जयंत पाटील
किशोरी पेडणेकर यांचा लुडो खेळताना फोटो व्हायरल होत आहे. त्या फोटोमध्ये त्या एका महिलेसोबत भरदिवसा लुडो खेळताना दिसत आहे. त्यावरून निलेश राणे यांनी त्यांना प्रश्न केला आहे. मुंबईच्या महापौर किशोरीताई पेडणेकर लुडोच्या माध्यमातून मुंबईचे प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करत आहेत. दिवसाढवळ्या लुडो खेळल्याने आपोआप मुंबईचे प्रश्न सुटणार आहेत म्हणून मुंबईकर आपण काळजी करू नका, अशी खोचक टिप्पणी त्यांनी केली आहे.
“निवडणुक झाली तर स्वागत नाही तर डबल स्वागत”; राज्यसभेच्या निवडणुकीबाबत राऊतांचं सुचक वक्तव्य
अगदी थोड्याच दिवसात पावसाळा सुरू होणार आहे. त्यामुळे मुंबईत पावसाचं पाणी साचू नये म्हणून नालेसफाईची कामे सुरू करायला हवी. तसेच अशी अनेक समस्या मुंबईकरांना सध्या अडचणीची ठरत आहेत. दरवर्षी पावसाचे पाणी साचुन मुंबईची तुंबई सारखी परिस्थिती निर्माण होते. त्यामुळे सत्ताधारी पक्षावर सातत्याने टिका होत आहेत.
“काॅंग्रेसकडून प्रतापगढ़ींना राज्यसभेची उमेदवारी जाहीर”; पटोले म्हणाले, “कोणीही नाराज नाही”
दरम्यान, आगामी काही काळात मुंबईत महापालिकेच्या निवडणुका होत आहेत. शिवसेनेने मुंबई अनेक वर्षापासून आपल्या ताब्यात ठेवली आहे. पंरतु यावेळी भाजप चांगलीच टक्कर देण्याचा प्रयत्न करणार आहे.
Read also:
- “शेतकऱ्यांना दोन पैसे जास्त मिळू लागले की केंद्र सरकारला ते पहावत नाही”; शरद पवार
- आघाडीत बिघाडी होण्याची शक्यता; काॅंग्रेस शिर्डीतील अधिवेशनात राजकीय बॉम्ब फोडणार
- अन् केंद्रीय मंत्र्यांनीच स्वत: च्या मुलाचा केला सत्कार; भावुक होऊन व्यासपीठावरच ढसाढसा रडले
- आघाडी अन् इतर अपक्ष सदस्यांची मतांचा हिशोब केला तर..; प्रफुल पटेलांनी सांगितलं विजयाचं सुत्र
- भाजपने वाढविली शिवसेनेची डोकेदुखी; महाडिकांना विजयासाठी लागणाऱ्या १० मतांची झाली तडजोड