अहमदनगर : राष्ट्रवादी काॅंग्रेसचे आमदार रोहित पवार यांच्या पुढाकाराने अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. यावेळी अहिल्यादेवी होळकर यांचे 9 वशंज असलेले राम शिंदे आणि भाजप नेते गोपीचंद पडळकर यांना आमंत्रित करण्यात आले नाहीत. त्यामुळे गोपीचंद पडळकर यांनी जेजुरीत जाऊन पुजा केली व त्याठिकाणी त्यांनी राष्ट्रवादी काॅंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला. त्यावरून आता राष्ट्रवादी काॅंग्रेसकडून जोरदार प्रत्युत्तर देण्यात आलं आहे.
आघाडीत बिघाडी होण्याची शक्यता; काॅंग्रेस शिर्डीतील अधिवेशनात राजकीय बॉम्ब फोडणार
देवेंद्र फडणवीस तुमच्या दोन्ही चेल्याचपाट्याना आवरा. आजच्या पावित्र दिनी अहिल्यामाईंच्या जन्मस्थळी जो तुमचा राजकीय आखाडा या तुमच्या पट्टशिष्यांच्या माध्यमातून मांडत आहात तो योग्य नाही. एकाला तुकडा मिळालाय दुसरा वणवण फिरतोय यांना आवर घाला व हे असले कपटी धंदे बंद करा, अशी खोचक टिप्पणी राष्ट्रवादी काॅंग्रेस आमदार अमोल मिटकरी यांनी केली आहे.
अन् केंद्रीय मंत्र्यांनीच स्वत: च्या मुलाचा केला सत्कार; भावुक होऊन व्यासपीठावरच ढसाढसा रडले
अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीदिनी गोपीचंद पडळकर यांना येऊ न दिल्यामुळे त्यांनी अहिल्यादेवींच्या पुतळ्याला दुग्धाभिषेक केला. तसेच हिंदू संस्कृती व मंदिरांचा जीर्णोद्धार करणाऱ्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी यांच्या पुतळ्याला मुंबई स्फोटात मृत्यूमुखी पावलेल्या हिंदूच्या रक्ताने माखलेले हात लागले होते. त्यामुळे या पुतळ्याला दुग्धाभिषेक करून आम्ही पुण्यश्लोक अहिल्यादेवींना मानवंदना दिली. यळकोट यळकोट जय मल्हार, असंही म्हणत त्यांनी शरद पवार यांच्यावर निशाणा साधला आहे.
आघाडी अन् इतर अपक्ष सदस्यांची मतांचा हिशोब केला तर..; प्रफुल पटेलांनी सांगितलं विजयाचं सुत्र
दरम्यान, अहमदनगर येथील चौंडी येथे आज पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची जयंती साजरी केली जात आहे. यावेळी शरद पवार, पालकमंत्री हसन मुश्रीफ आमदार निलेश लंके, माजी मंत्री अण्णासाहेब डांगे, भुषणसिंहराजे होळकर, बाळासाहेब अजबे, रामहरी रूपनर, अनिल गोटे, अक्षय शिंदे, सक्षणा सलगर आदी उपस्थित होते. मात्र गोपीचंद पडळकर यांना कार्यक्रमाला निमंत्रित करण्यात न आल्याने त्यांनी आक्रमक भूमिका घेतली व सदाभाऊ खोतांसोबत गोपीचंद पडळकर चौंडी याठिकाणी जात असताना त्यांना पोलिसांनी अर्ध्या रस्त्यावरच अडवले.
Read also:
- राष्ट्रवादीला सेनेचा मुख्यमंत्री नको की सेनेला राष्ट्रवादीचा मुख्यमंत्री नको? महाविकासआघाडीत नवी वादाची ठिणगी?
- “दिपाली सय्यद यांच्यावर त्वरीत कारवाई करून त्यांचा पायउतार करावा”; भाजपचं महिला आयोगाला पत्र
- “25 वर्ष सेनेचा मुख्यमंत्री, तर राष्ट्रवादीसाठी सुप्रिया सुळे यांचं नवस, मग काॅंग्रेस काय फक्त सतरंज्या उचलणार?”
- पेडणेकरांचा लुडो खेळताना फोटो व्हायरल; निलेश राणे म्हणाले, ”मुंबईकरांनो तुमचे प्रश्न आता..;”
- “शेतकऱ्यांना दोन पैसे जास्त मिळू लागले की केंद्र सरकारला ते पहावत नाही”; शरद पवार