मुंबई : आगामी काही काळात राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा धुराळा उडणार आहे. त्याआधीच आज मुंबईच्या रंगशारदा सभागृहात मुंबई महापालिका निवडणुकसाठीची वॉर्डनिहाय आरक्षण सोडत जाहीर करण्यात आली. यावेळी आरक्षित वॉर्डाची लॉटरी पद्धतीने निवड करण्यात आली आहे. त्यामुळे यावेळी अनेक प्रस्थापित नगरसेवकांना आपले वॉर्ड गमवण्याची वेळ आली आहे.
पेडणेकरांचा लुडो खेळताना फोटो व्हायरल; निलेश राणे म्हणाले, ”मुंबईकरांनो तुमचे प्रश्न आता..;”
महापालिकेच्या निवडणुकीसाठी अनुसुचित जाती आणि महिलासांठी वॉर्ड सोडत जाहीर केली आहे. यांमुळे सर्वच पक्षांमधील नगरसेवकांना या रचनेचा फटका बसला आहे. त्यामुळे आता संबंधित आरक्षित वॉर्डमध्ये नवे उमेदवार शोधणे आणि प्रस्थापित नगरसेवकांसाठी दुसरा वॉर्ड शोधणे, अशी दुहेरी कसरत राजकीय पक्षांना महापालिकेच्या निवडणुकीत करावी लागणार आहे.
“शेतकऱ्यांना दोन पैसे जास्त मिळू लागले की केंद्र सरकारला ते पहावत नाही”; शरद पवार
शिवसेना नगरसेवक अमेल घोले, काॅंग्रेस नेते आणि पालिकेचे माजी विरोधी पक्षनेते रवी राजा, भाजपचे माजी गटनेते प्रभाकर शिंदे आणि बेस्टचे माजी अध्यक्ष व शिवसेना नेते आशिष चेंबुरकर यांना यंदा आपला वॉर्ड सोडावा लागणार आहे. तर अमेल घोले, रवी राजा आणि प्रभाकर शिंदे यांचा वॉर्ड महिलांसाठी आरक्षित झाला आहे. तर आशिष चेंबुरकर यांचा वॉर्ड अनुसुचित वर्गासाठी आरक्षित झाला आहे. याशिवाय मुंबई महानगरपालिकेच्या स्थायी समितीचे माजी अध्यक्ष यशवंत जाधव यांना वॉर्ड क्रमांक 117 हा देखील महिलांसाठी आरक्षित झाला आहे. तर मुंबईचे माजी महापौर यांनाही त्यांचा वॉर्ड क्रमांक 96 महिला आरक्षणामुळे गमवावा लागला आहे. त्यामुळे सगळ्याच राजकीय पक्षांना आता नवीन उमेदवार शोधावा लागणार आहे.
आघाडीत बिघाडी होण्याची शक्यता; काॅंग्रेस शिर्डीतील अधिवेशनात राजकीय बॉम्ब फोडणार
दरम्यान, मुंबईत सध्या शिवसेनेची सत्ता असून गेल्या 25 वर्षापासून आहे. मात्र यावेळी भाजप महापालिकेच्या निवडणुकीत जोरदार टक्कर देण्याची शक्यता आहे. त्यामुळे या निवडणुकांमध्ये राजकीय पक्षांमध्ये जोरदार रंगत बघायला मिळणार आहे. तर यावरून आपल्या सोयीनुसार प्रभाग रचना केल्या असल्याची टिका काॅंग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केली आहे.
Read also:
- केंद्राच्या योजनांमध्ये राज्याचा मोठा वाटा; राज्याच्या नियोजनबद्ध अंमलबजावणीने योजना सर्वदूर पोहचल्या – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
- “फडणवीससाहेब तुमच्या दोन्ही चेल्याचपाट्याना आवरा; एकाला तुकडा मिळलाय दुसरा वणवण फिरतोय”
- राष्ट्रवादीला सेनेचा मुख्यमंत्री नको की सेनेला राष्ट्रवादीचा मुख्यमंत्री नको? महाविकासआघाडीत नवी वादाची ठिणगी?
- “दिपाली सय्यद यांच्यावर त्वरीत कारवाई करून त्यांचा पायउतार करावा”; भाजपचं महिला आयोगाला पत्र
- “25 वर्ष सेनेचा मुख्यमंत्री, तर राष्ट्रवादीसाठी सुप्रिया सुळे यांचं नवस, मग काॅंग्रेस काय फक्त सतरंज्या उचलणार?”