पिंपरी चिंचवड – राज्यातील बैलगाडा शर्यती सुरू झाल्या त्याचे श्रेय आमदार महेश लांडगे आणि अखिल भारतीय बैलगाडा संघटनेचे श्रेय आहे. ‘‘बैल पळू शकतो…’’ असा अहवाल आम्ही तयार केला. त्याला सर्वोच्च न्यायालयात न्याय मिळाला. त्यामुळे बैलगाडा शर्यत सुरू झाली. बैलागाडा शर्यती बंद झाल्यामुळे गावगाडा, शेतकऱ्यांचे नुकसान झाले होते. आता जीवाची बाजी लावू पण बैलगाडा शर्यत कदापि बंद होवू देणार नाही, असा विश्वास राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस व्यक्त केला.
भाजपा शहराध्यक्ष व आमदार महेश लांडगे यांच्या मार्गदर्शनाखाली माजी महापौर नितीन काळजे आणि माजी महापौर राहुल जाधव यांच्या पुढाकाराने टाळगाव चिखली येथे भारतातील सर्वांत मोठी बैलगाडा शर्यत भरविण्यात आली. शर्यतीच्या अंतिम फेरीचा थरार अनुभवण्यासाठी माजी मुख्यमंत्री व विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस उपस्थित राहिले.
देवेंद्र फडणवीस म्हणाले की, देशातील सर्वांत मोठी शर्यत महेश लांडगे यांनी सुरू केली. अहोरात्र मेहनत घेवून महेशदादा यांनी मंत्रालय, सर्वोच्च न्यायालात परिश्रम घेतले. बैलगाडा शर्यती सुरू होण्यामध्ये त्यांचा सिंहाचा वाटा आहे. अखिल भारतीय बैलगाडा संघटना, तत्कालीन पशुसंवर्धन मंत्री महादेव जानकर, माजी राज्यमंत्री बाळा भेगडे यांनीही बैलगाडा शर्यतीसाठी योगदान दिले.
अन् केंद्रीय मंत्र्यांनीच स्वत: च्या मुलाचा केला सत्कार; भावुक होऊन व्यासपीठावरच ढसाढसा रडले
आमदार लांडगे म्हणाले की, महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना बैलगाडा शर्यतींचा आनंद घेता येत आहे. त्याचे श्रेय केवळ तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचेच आहे. २०१७ पर्यंत एकाही राज्यकर्त्याने बैलगाडा शर्यत सुरू व्हावी. याकरिता राज्य शासनाचा एक रुपयाही खर्च केला नाही. खंडोबाची शप्पत घेवून सांगतो… फडणवीस यांनी प्रत्येक सुनावणीला होणारा सुमारे २०लाख रुपयांचा खर्च कसा उभारायचा? असा प्रश्न होता. त्यावेळी फडणवीस यांनी शर्यतीच्या खटल्याचा खर्च राज्य सरकार करेल, असा निर्णय घेतला. कायदा करण्यासाठी आम्ही विधानभवनावर आम्ही बैलगाडा आंदोलन घेवून गेलो. त्यावेळी मुख्यमंत्री असलेले फडणवीस स्वत: निवेदन स्वीकारायला आले. पण, फडणवीस यांनी कधी श्रेय घेतले नाही.
भाजपने वाढविली शिवसेनेची डोकेदुखी; महाडिकांना विजयासाठी लागणाऱ्या १० मतांची झाली तडजोड
तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बैलगाडा शर्यत सुरू करण्याबाबत तमिळनाडू आणि कर्नाटकच्या धर्तीवर कायदा तयार केला. मात्र, या कायद्याला अजय मराठे या व्यक्तीने न्यायालयात आव्हान दिले. त्या मराठेच्या पाठिशी कोण होते? असा सवाल उपस्थित करीत केवळ फडणवीस यांना श्रेय मिळू नये. याकरिता काही लोकांनी राजकारण केले, अशी टीकाही आमदार महेश लांडगे यांनी केली.
आघाडी अन् इतर अपक्ष सदस्यांची मतांचा हिशोब केला तर..; प्रफुल पटेलांनी सांगितलं विजयाचं सुत्र
तसेच अखिल भारतीय बैलगाडा संघटनेचे अध्यक्ष संदीप बोदगे म्हणाले की, राज्यातील बैलगाडा शर्यती सुरू करण्यासाठी आमदार महेश लांडगे यांनी मदत केली. राज्यातील सर्वच पक्षांचा बैलगाडा शर्यतीला विरोध नव्हता. पण, सर्वाधिक मदत देवेंद्र फडणवीस आणि महेश लांडगे यांनी केली. बैलगाड्याचे चाक आणि ग्रामीण अर्थकारण याचा अतूट संबंध आहे. राज्यातील तत्कालीन भाजपा सरकारने बैलगाडा सुरू करण्याबाबत कायदा केला. तमिळनाडू आणि कर्नाटकच्या धर्तीवर कायदा करण्यासाठी फडणवीस यांनी पुढकार घेतला. या कायद्याला न्यायालयात आव्हान देण्यात आले. त्यावेळी फडणवीस यांनी न्यायालयात तज्ज्ञ वकीलांची नेमणूक करुन त्याचा खर्च राज्य सरकारने करावा, असा मोठा निर्णय घेतला. तसेच, बैलांची धावण्याची क्षमता अहवाल तयार करण्यासाठी समितीची नियुक्ती केली. या समितीच्या अहवालामुळेच सर्वोच्च न्यायालयात बैलगाडा खटला लढवण्यास मदत झाली. तसेच, केंद्र सरकारकडे पाठपुरावा करुन बैलांना संरक्षित प्राण्यांच्या यादीतून वगळण्यासाठी पाठपुरावा करावा, असे आवाहनही फडणवीस यांना केले.
Read also:
- “बैल काही एकटा येत नाही, जोडीने येतो, ते पण नांगरसकट”; बैलगाडा शर्यतीत फडणवीसांचा हुंकार
- राज्यसभा उमेवारीवरून कॉंग्रेसमध्ये नाराजीनाट्य..कॉंग्रेस सरचिटणीसांनीच दिला राजीनामा
- “तुमच्या आमदाराने याठिकाणी खुप चांगलं काम केलंय”; शरद पवारांकडून रोहित पवारांचं कौतुक
- राजकारणात हातखंड असणाऱ्या वडिलांच्या छत्रछायेत वाढलेल्या राजकीय लेकींची मुख्यमंत्रीपदाची महत्वाकांक्षा पूर्ण होईल का?
- “चौंडी ही पवारांच्या बापाची जहागिरी नाही”; सदाभाऊ खोतांचा शरद पवारांविरोधात एल्गार