मुंबई : नारायण राणे यांना शिवसेनेतून बाहेर पडण्यासाठी राष्ट्रवादी काॅंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी मदत केली होती. त्याचबरोबर राज ठाकरे यांच्यापाठीमागे देखील त्यांचाच हात असल्याचा आरोप शिंदे गटातील प्रवक्ते दिपक केसरकर यांनी केलं आहे. यावर आता राष्ट्रवादी काॅंग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी दिपक केसरकरांवर निशाणा साधला आहे.
“आम्ही केंद्र सरकारविरोधात तुटून पडू, तुम्ही राज्य सरकारवर तूटून पडा”; सुप्रिया सुळे
केसरकर साहेब सद्या तुम्ही हवेत आहात. पवार साहेबांवर बोलल्याने प्रसिध्दी मिळते हे तुम्ही जाणुन आहात. तुमची अजितदादांसमोर असणारी केविलवाणी अवस्था मी अनेकदा पहिली आहे. उगाच आम्हाला तोंड उघडायला लाऊ नका. हवेतून खाली या. तसेही तुमची बडबड जास्त दिवस चालणार नाही, असं म्हणत अमोल मिटकरी यांनी दिपक केसरकरांवर टिका केली आहे.
मुख्यमंत्र्यांच्या स्थानिक शिष्याची मोठी शिष्टाई, गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने बदली नकोचा आग्रह
अहो केसरकर.. किती बोलता पवार साहबांविरुद्ध एके काळी साहेबांनी अनेकांना नाराज करत तुम्हाला सिंधुदुर्ग आणि गोव्यात हाताला धरून फिरवले. ज्या ताटात जेवलात त्यातच थुंकायचे हे कुठून शिकलात. 2014 ला मीच आलो होतो. साहेबांचा निरोप घेऊन जिथे आहात तिथे सुखी राहा खाजवून खरूज काढू नका. असा टोला जितेंद्र आव्हाड यांनी दिपक केसरकरांना लगावला आहे.
उस बिलासाठी मालमत्ता गहाण ठेवली, आता थेट कारखान्याच्या अध्यक्षपदी निवड
दरम्यान, 2014 मध्ये महाराष्ट्रात भाजपचं सरकार स्थापन झालं. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाले. त्यावेळी साधं शपथविधीचं निमंत्रणही शिवसेनेला देण्यात आलं नव्हतं. मात्र त्यच शिवसेनेतून बंडखोरी करणारे आमदार, मुख्यमंत्री, प्रवक्ते आज भाजपसमोर लोटांगण घालत आहेत. खऱ्या अर्थाने बाळासाहेबांना अश्रू आणि वेदना देणारी कृती केसरकर आणि शिंदे गटाने केली आहे. याच्याशी शरद पवारांचा संबंध नसल्याचंही ते म्हणाले.
Read also
- “आम्ही केंद्र सरकारविरोधात तुटून पडू, तुम्ही राज्य सरकारवर तूटून पडा”; सुप्रिया सुळे
- “आधी फोन कोणी करावा, यावरून शिवसेना भाजप युतीचा खोळंबा”; इतर मंत्र्यांचा शपथविधी कधी?
- “ज्या ताटात जेवलात, त्यातच थुंकायचे हे कुठून शिकलात”? आव्हाडांचा केसरकरांना टोला
- “सरकार बेकायदेशीर, केसरकर तुम्ही सुद्धा बेकायदेशीर प्रवक्ते”
- मुंबई महापालिकेवर राष्ट्रवादीचा झेंडा फडकाविण्याची संधी, तयार रहा; शरद पवार