मुंबई : राज्यात आगामी काही काळात महापालिकेच्या निवडणुका होऊ घातल्या आहेत. त्याची तयारी राजकीय पक्ष जोरदार करताना दिसत आहेत. याच पार्श्वभूमीवर मुंबईत राष्ट्रवादी काॅंग्रेसच्या प्रदेश कार्यकारिणीची आणि मुंबई विभागीय कार्यकारिणीची आढावा बैठक घेण्यात आली. यामध्ये अध्यक्ष शरद पवार यांनी कार्यकर्त्यांना महत्वाच्या सुचना दिल्या.
प्रभाग रचनेवरून काॅंग्रेसने शिवसेनेला घेरलं; थेट पत्रचं पाठवलं
मुंबई महानगरपालिकेची निवडणूक जवळ आली आहे. मुंबईतील सर्व जिल्हाध्यक्ष, कार्याध्यक्ष यांनी निवडणुकीच्या तयारीला लागावे. या निवडणुकीत पक्षाचे वरिष्ठ नेते वेळ देतीलच, त्यासोबत मी देखील वेळ देईन. मुंबईतील पदाधिकाऱ्यांनी मला कुठल्या वॉर्डमध्ये न्यायचे हे ठरवावे, त्याठिकाणी यायला मी तयार आहे. कार्याध्यक्ष राखी जाधव आणि कार्याध्यक्ष नरेंद्र राणे यांना निवडणुकीचा आराखडा तयार करावा अशी माझी सूचना आहे. असं शरद पवारांनी म्हटलं आहे.
शिंदे गटाला धडा शिकवणारच, असं जाहीर वक्तव्य करणाऱ्या सेनेच्या नेत्याचा 2 दिवसात शिंदेंना पाठिंबा
मुंबई महानगरपालिकेमध्ये तुमच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेसला आपला झेंडा फडकाविण्याची संधी आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रदेश कार्यकारिणीची आणि मुंबई विभागीय कार्यकारिणीची आढावा बैठक अनुक्रमे काल आणि आज आयोजित करण्यात आली. अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी आपापली मते दोन्ही दिवस झालेल्या बैठकीत मांडली. यापुढे संघटना वाढवून ती बळकट करायचे व शेवटच्या कार्यकर्त्याला शक्ती देऊन त्याची प्रतिष्ठा कशी राखली जाईल, हा प्रयत्न करण्याचे काम आपल्याला करायचे आहे. असंही शरद पवारांनी म्हटलं आहे.
Read also
- “शिवसेनेचं धनुष्यबाण एकनाथ शिंदेंना द्यावं;” रामदास आठवलेंचं वक्तव्य
- मुख्यमंत्र्यांच्या स्थानिक शिष्याची मोठी शिष्टाई, गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने बदली नकोचा आग्रह
- उस बिलासाठी मालमत्ता गहाण ठेवली, आता थेट कारखान्याच्या अध्यक्षपदी निवड
- “मरायच्या आधी तुझा काळ बनणार, फडणवीसांना सर्व सांगणार”; भाजप नेत्याची ऑडिओ क्लिपही व्हायरल
- केसरकर हे उडते पंछी; इकडनं उड, तिकडे बस; पेडणेकरांची दिपक केसरकरांवर खोचक टिका