पिंपरी । विशेष प्रतिनिधी देशभरात गुरूपौर्णिमा साजरी झाली, तशी पिंपरी-चिंचवडच्या राजकारणात आणि प्रशासनातही साजरी झाली. शहराचे प्रशासक आणि पालक असलेले आयुक्त राजेश पाटील आपल्या दोन सहकाऱ्यांसोबत अर्थात अतिरिक्त आयुक्त जितेंद्र वाघ आणि विकास ढाकणे यांच्यासोबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ‘दर्शना’साठी गुरूपौर्णिमेच्या पूर्वसंध्येला दाखल झाले. शहरातील शिंदेंचा एक निष्ठावंत ‘शिष्य’असलेल्या नेत्याने त्यासाठी शिष्टाई केली, अशी खात्रीलायक माहिती आहे.
राज्यातील महाविकास आघाडी सरकारला पायउतार व्हावे लागले. महाविकास आघाडीच्या कृपाशिर्वादाने पिंपरी-चिंचवड महापालिकेत पाटील, वाघ आणि ढाकणे या अधिकाऱ्यांची वर्णी लागली. त्यामुळे आपसूक महाविकास आघाडीच्या नेत्यांची ‘पाटीलकी’गेल्या अडीच वर्षांत पहायला मिळाली.
“शिवसेना फोडण्यात राष्ट्रवादीचा मोठा हात”; दिपक केसरकरांचा शरद पवारांवर गंभीर आरोप
राज्य शासनाकडून नियुक्त झालेल्या अधिकाऱ्यांच्या मदतीने राष्ट्रवादीसह शिवसेनेनेसुद्धा तत्कालीन सत्ताधारी भाजपाचा ‘प्रशासकीय बंदोबस्त ’ करायला सुरूवात केली. मग, कचरा डेपो आग प्रकरण असो किंवा कुत्र्यांची नसबंदी… आयुक्तांनी चौफेट फटकेबाजी करीत महाविकास आघाडीला सकारात्मक भूमिका ठेवली. त्यावर भाजपाच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांनी अनेकदा आरोपही केले. ‘त्रिमूर्ती’सारखे अस्त्र सोबत असल्यामुळे सेना- राष्ट्रवादीच्या स्थानिक नेत्यांची राजकीय ताकद कमालीची वाढली होती. त्यामुळे महापालिका निवडणुकीत महाविकास आघाडीला यश मिळणार, असे आडाखे बांधले जात होते.
“बाळासाहेब असते तर अशा लोकांना त्यांनी त्यांच्या स्टाईलने फटकारलं असतं”
दरम्यान, शिवसेनेत एकनाथ शिंदेंच्या रुपाने मोठी बंडखोरी झाली. महाविकास आघाडीचे सरकार कोसळले आणि भाजपा- शिवसेना (शिंदे गट) असे नवे सरकार स्थापन झाले. नव्या सरकार स्थापनेमुळे आयुक्त पाटील आणि सहकारी यांची बदली होणार, अशी चर्चा सुरू झाली. किंबहुना, भाजपाच्या काही नेत्यांनी पाटलसह वाघ आणि ढाकणे यांच्या बदलीसाठी राज्यस्तरावर प्रयत्न सुरू केल्याचे बोलले जाते. त्यामुळे अवेळी बदली केल्यास भाजपाचे पारडे जड होईल, या भीतीने राष्ट्रवादी आणि शिवसेनेच्या स्थानिक नेत्यांनी एकत्रितपणे प्रयत्न सुरू केले. आता एकनाथ शिंदेंकडे कोण जाणार? असा प्रश्न निर्माण झाला. त्यावर शिंदे यांचे निकटवती र् असलेले शिवसेनेतील एक स्थानिक नेता यांच्याकडे ही जबाबदारी सोपवल्याचे सूत्रांनी सांगितले.
किती दिवस फक्त खड्डे, पूर, गेलेले आमदार, खासदार ह्याची चर्चा करत बसणार?
भाजपाच्या पायाखालची वाळू सरकली…
दरम्यान, उपमुख्यमंत्रीपदी देवेंद्र फडणवीस यांची ताकद सोबत असतानाही पिंपरी-चिंचवडमधील भाजपाच्या स्थानिक नेत्यांना आयुक्त राजेश पाटील, अतिरिक्त आयुक्त जितेंद्र वाघ आणि विकास ढाकणे या ‘त्रिमूर्ती’ची धास्ती आहे. त्यातच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून शिवसेनेच्या एका नेत्याने तिघांचीही बदल करु नका. हे अधिकारी शहराच्या हिताचेच काम करीत आहेत, असा आग्रह मुख्यमंत्र्यांकडे धरल्याचे बोलले जाते. निवडणुकीच्या तोंडावर शिंदे समर्थकांकरवी अधिकारी आपला दबाव निर्माण करीत असल्यामुळे भाजपाच्या पायाखालची वाळू सरकली आहे, असे खासगीत बोलले जात आहे.
Read also
- उस बिलासाठी मालमत्ता गहाण ठेवली, आता थेट कारखान्याच्या अध्यक्षपदी निवड
- “मरायच्या आधी तुझा काळ बनणार, फडणवीसांना सर्व सांगणार”; भाजप नेत्याची ऑडिओ क्लिपही व्हायरल
- केसरकर हे उडते पंछी; इकडनं उड, तिकडे बस; पेडणेकरांची दिपक केसरकरांवर खोचक टिका
- प्रभाग रचनेवरून काॅंग्रेसने शिवसेनेला घेरलं; थेट पत्रचं पाठवलं
- शिंदे गटाला धडा शिकवणारच, असं जाहीर वक्तव्य करणाऱ्या सेनेच्या नेत्याचा 2 दिवसात शिंदेंना पाठिंबा