मुंबई : महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गुरूपौर्णिमेच्या निमित्ताने ट्विट करून शिवसेना प्रमुख बाळासाहॆब ठाकरे आणि धर्मवीर आनंद दिघे यांना अभिवादन केले आहे. त्यात त्यांनी बाळासाहेबांच्या विचारांशी प्रतारणा नाहीच असं म्हणत त्यांनी पुन्हा एकादा उद्धव ठाकरे यांना एकप्रकारे इशारा दिला आहे. त्यावर आता शिवसेनेचे खासदार संजय राऊतांनी त्या प्रतिक्रिया दिली आहे.
“राज्यात मोठी फाटाफूट झाली तरी राष्ट्रवादीचा एकही आमदार फुटला नाही, याचा अभिमान”
बाळासाहेब ठाकरे हे सर्वांचे गुरू होते. त्यांच्यात ब्रम्हा, विष्णू, महेश होते. बाळासाहेब आमचे तेजस्वी नेते होते. त्यांनी आम्हाला सावरले. देश त्यांना गुरूस्थानी मानतो. एकनिष्ठेने शिवसैनिक बाळसाहेबांसोबत आहेत. एकनिष्ठा हीच गुरूदक्षिणा असते आम्ही या उपकाराखाली नेहमी राहु, असं म्हणत त्यांनी एकनाथ शिंदे यांच्या ट्विटवर अप्रत्यक्षपणे टोला लगावला आहे.
कोर्टाच्या निर्णयामुळे ओबीसींना दिलासा; आरक्षण मिळणारच भुजबळांना खात्री
बाळासाहेबांनी आम्हाला सर्व काही दिले. गुरू हा मोकळ्या हाताने देणारा असतो. बाळासाहेबांसारखा गुरू होणे नाही. त्यांनी मोकळ्या हाताने उधळण केली. बाळासाहेब महाराष्ट्राचे नव्हे तर देशाचे गुरू होते. प्रत्येक दिवशी या गुरूचे स्मरण आम्हाला होते. बाळासाहेबांचे आमच्यावर उपकार आहेत. त्यांना कदापि विसरणार नाही. आश्चर्य वाटते काही लोक शिवसेनेच्या बाहेर जाऊन म्हणतात, बाळासाहेब आमचे गुरू. आज बाळासाहेब असते तर अशा लोकांना त्यांनी त्यांच्या स्टाईलने फटकारलं असतं, असंही राऊत म्हणाले.
कोर्टाच्या निर्णयामुळे ओबीसींना दिलासा; आरक्षण मिळणारच भुजबळांना खात्री
दरम्यान, कुणाला उत्तर द्यायचे कुणाला पक्षाने उत्त दिलं आहे. ही कायदेशीर लढाई आहे. तर तुम्ही कोर्टात का गेला. तो रडीचा डाव नव्हता का? असा सवाल करीत त्यांनी बंडखोर आमदार दिपक केसरकर यांनाही टोला लगावला. बाळासाहेबांच्या विचारांची प्रतारणा नाहीच. विझणार कधीच अंगार नाही,हिंदुत्वाशिवाय विचार नाही..गुरूपौर्णिमेनिमित्त विनम्र अभिवादन. असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ट्विट मध्ये म्हटले आहे.
बाळासाहेबांच्या विचारांशी प्रतारणा नाहीच.
विझणार कधीच अंगार नाही, हिंदुत्वाशिवाय विचार नाही….
गुरुपौर्णिमेनिमित्त विनम्र अभिवादन…#गुरुपौर्णिमा pic.twitter.com/NKYUBOYQXk
— Eknath Shinde – एकनाथ शिंदे (@mieknathshinde) July 13, 2022
Read also
- किती दिवस फक्त खड्डे, पूर, गेलेले आमदार, खासदार ह्याची चर्चा करत बसणार?
- भाजप नेत्याचा हॉटेलमधील महिलेसोबतचा वादग्रस्त व्हिडीओ व्हायरल; चित्रा वाघ म्हणाल्या…;
- “एकनाथ शिंदे अन् उद्धव ठाकरेंची मातोश्रीवर आज भेट” शिवसेना नेत्याची माहिती
- “सत्ता नसलेला काळ हा समाधान देणारा, माझा व्यक्तिगत अनुभव;”शरद पवार
- आघाडी सरकारने ओबीसी आरक्षणाची पायाभरणी घालून दिली असताना आता दिरंगाई कशासाठी ?