मुंबई : राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांमधील ओबीसींच्या आरक्षणावर सुप्रीम कोर्टात आज सुनावणी झाली. कोर्टाने सुनावणी पुढे ढकलली आहे. 19 तारखेला पुन्हा कोर्टात सुनावणी होणार आहे. त्यानंतर न्यायालयाने याचिकेवर निर्णय होईपर्यंत नव्याने निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर करण्यास निवडणुक आयोगाला मनाई केली आहे. कोर्टाच्या निर्णयामुळे ओबीसींना दिलासा मिळाला आहे असं राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांनी म्हटले आहे.
“मला गद्दार म्हणा किंवा अजून काही, माझी प्रतिक्रिया तीच राहणार”; उदय सामंतांची पत्राद्वारे भूमिका
19 तारखेला होणाऱ्या निकालावरून पुढील कारवाई करण्यात येणार आहे. नक्कीच ओबीसींना दिलासा मिळाला आहे. नगरपालिका निवडणुकीत निश्चित ओबीसींना आरक्षण मिळेल असा विश्वास आहे. असं राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ म्हणाले. याचबरोबर भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी राज्यातील होणाऱ्या निवडणूकांना तात्काळ स्थगिती द्यावी अशी मागणी केली आहे. 92 ठिकाणी नगरपालिकेच्या निवडणूका होणार आहेत या निवडणुका राजकीय आरक्षणातच झाल्या पाहिजेत.
सदा सरवणकरांचा सेनेला जय महाराष्ट्र; फाटक, शहांची शिवसेनेतुन हकालपट्टी
या नंतर उरलेल्या निवडणूकांना ओबीसी आरक्षण देणे म्हणजे समान न्याय नाही. ओबीसी आरक्षण मिळणार आहे हा आत्मविश्वास लोकांमध्ये आहे. हा विश्वास नवीन सरकार लोकांना देत आहे. हा विश्वास तेव्हाच फलीत ठरेल जेव्हा ओबीसी आरक्षण सर्वांना मिळेल. या निवडणुकांना आरक्षण मिळणे हा त्यांचा हक्क आहे. राजकीय आरक्षणातूनच या निवडणुका झाल्या पाहिजेत.मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी निवडणुक आयोगाशी याबाबत चर्चा केली पाहिजे. त्यांनी या निवडणुकांना तात्काळ स्थगिती दिली पाहिजे. या निवडणुका ओबीसी आरक्षणासहित घेतल्या पाहिजेत.
“द्रौपदी मूर्मूंना पाठिंबा दिला म्हणजे भाजपला नाही”; राऊतांनी भाजपला डिवचलं
निवडणुकांना स्थगिती देण्यासाठी अनेक कारणे आहेत. अतिवृष्टी, महापुर अशी अनेक गंभीर कारणे आहेत पण ओबीसी आरक्षण हेही तितकेच गंभीर कारण आहे. ही सर्व कारणे समोर ठेवून निवडणुका स्थगित केल्या पाहिजेत. मागच्या सरकारने वेळोवेळी विश्वास दिला पण आता आमचे सरकार आल्याने आमचा विश्वास दुणावला आहे हे सरकार ओबीसींच्या हिताचे आहे. आरक्षण देण्याची त्यांची मानसिकता आहे असं पंकजा मुंडे म्हणाल्या.
Read also
- भाजप नेत्याचा हॉटेलमधील महिलेसोबतचा वादग्रस्त व्हिडीओ व्हायरल; तात्काळ पदावरून काढलं
- पाहिला.. पाहिला.. पाहिलो वो, माझा देव कुणी पाहिला; चिमुकल्याला फडणवीसांची भुरळ
- साहेब तुमच्या पत्राने शंभर हत्तीचं बळ मिळालंय; आमदार राहुल पाटलांचे उद्धव ठाकरेंना पत्र
- “पवार साहेबांनी भाजपचा अश्वमेध रोखला”
- “वेळ पडली तर मंत्र्यांच्या गाड्या देखील फोडू”; ओबीसी संघटनेने सरकारला दिला इशारा