मुंबई : राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत भाजपकडून द्रौपदी मूर्मू यांना उमेदवारी देण्यात आली आहे. गेल्या अनेक दिवसांपासून या मुद्याबाबत भाजप उमेदवार द्रौपदी यांना शिवसेना पाठिंबा देणार आहे. त्यावर शिवसेनेचा द्रौपदी मूर्मू यांना पाठिंबा आहे पण भाजपला नाही असं शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी सांगितले आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आज किंवा उद्या जाहीर करणार असल्याचे स्पष्ट केले आहे.
“आगामी निवडणुकांसाठी राष्ट्रावादीचा मोठा निर्णय”; निवडणुकीत २७ टक्के ओबीसी आरक्षण देणार
शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे राष्ट्रपती निवडणूकीत खासदारांचही मत जाणून घ्यायचे. उद्धव ठाकरे यांनीही खासदारांची भुमिका समजून घेतली आहे. राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीबाबत देशात वेगवेगळे मत प्रवाह आहेत. द्रौपदी मूर्मू या पहिल्या आदिवासी भागातील महिला आहेत. राज्यात मोठ्या प्रमाणात आदिवासी समाज आहे. शिवसेनेने या पुर्वी प्रतिभाताईना पाठिंबा दिला होता. त्यावेळी एनडीएला दिला नव्हता. एनडीएत असताना प्रणव मुखर्जी यांनाही पाठिंबा दिला होता. शिवसेनेला अशा प्रकारचे निर्णय घेण्याची परंपरा आहे. यावर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे निर्णय घेतील. पक्षप्रमुखांचा निर्णय सर्वाना बंधनकारक आहे असं राऊत म्हणाले.
“पवारांना माहिती नव्हतं तर ठाकरेंनी मंत्र्यांना गाणी ऐकायला बोलावले होते का?”
याचबरोबर सर्वोच्च न्यायालयाचे आभार. सर्वोच्च न्यायालय घटना पीठ स्थापन करत आहे, त्याबद्दल आभारी आहोत. कोर्टाने विधानसभा अध्यक्षांना कारवाई पासुन रोखले आहे. घटनापीठ स्थापन करून ऐकलं जाईल याचा अर्थ कोर्टाने हे गांभिर्याने घेतले आहे असं राऊत म्हणाले. शिवसेनेच्या खासदारांची मुंबई मध्ये बैठक घेण्यात आली. या बैठकीला शिवसेनेचे काही खासदार उपस्थित नव्हते. याचमुळे शिवसेनेच्या आमदारांनंतर आता खासदार ही एकनाथ शिंदे गटात जाणार असल्याच्या ही चर्चा सुरू आहेत. राष्ट्रपती पदाच्या उमेदवार द्रौपदी मूर्मू यांना शिवसेना पाठिंबा देण्याबाबत चर्चा करण्यासाठी ही बैठक घेण्यात आली होती.
काॅंग्रेसचे 5 आमदार भाजपच्या संपर्कात; काॅंग्रेसलाही बसणार मोठा धक्का
दरम्यान, उद्धव ठाकरे यांच्या उपस्थित 9 जुलै रोजी मातोश्रीवर बैठक पार पडली होती. या बैठकीत विधान परिषदेतील विरोधी पक्षनेता, गटनेता, प्रतोद नियुक्तीचे सर्वाधिकार पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडे देण्याचा ठराव करण्यात आला होता. महाविकास आघाडीत शिवसेनेकडे विधान परिषदेचे सर्वाधिक 13 आमदार आहेत. त्यामुळे आता विधान परिषेदमधील विरोधी पक्षनेता कोण असणार ? त्याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिलं आहे.
Read also
- “आमच्याकडे एकनाथ खडसेंसारखा नेता”; विधान परिषदेच्या विरोधी पदासाठी सेना, राष्ट्रवादीमध्ये चुरस
- “तुमच्याकडे फक्त सहा महिन्याचं आयुष्य, शरद पवारांनी पैज लावली अन् ती जिंकलीही”
- “माझ्याकडे तुम्हाला देण्यासाठी काहीही नाही, परंतु मला तुमची ताकद हवीय”
- “प्रशासनाला विनाकारण ताण येईल, असं काहीही करू नका”; राज ठाकरेंचं कार्यकर्त्यांना आवाहन
- महाराष्ट्र, मध्यप्रदेश आता गुजरात अन् गोवामध्ये देखील ओबीसीचे राजकीय आरक्षण धोक्यात