मुंबई : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची काल पुणे शहरातील शिवसेनेच्या पदाधिकारी यांनी भेट घेतली. आम्ही सर्व शिवसेने सोबत आहे असे ते यावेळी म्हणाले. यावर आता माझ्याकडे तुम्हाला देण्यासाठी काहीही नाही, परंतु मला तुमची ताकद मला हवी आहे. लढायचे असेल तर सोबत राहा, भाजपाचा शिवसेनेला संपवण्याचा डाव आहे, असा पुनरुच्चार शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केला.
‘आरे वाचवा’ आंदोलनात लहान मुलांचा समावेश; बालहक्क आयोगाचं पत्र, ठाकरेंवर कारवाई होणार?
शिवसेनेच्या आमदारांच्या बंडानंतर अनेक पदाधिकारी आणि नेत्यांनी उद्धव ठाकरे यांची भेट घेतली आहे. यातच शिवसेनेच्या पुण्यातील पदाधिकारी व माजी नगरसेवकांनी उद्धव ठाकरे यांची भेट घेतली आहे. यावेळी ठाकरे यांनी शिवसैनिकांना भावनिक साद घालत शिवसेनेतून बाहेर पडलेल्या आमदारांवर टीका केली. पुढच्या काळात आपण एकत्रित काम करून शिवसेनेला पुन्हा एकदा बलवान बनवायचे असल्याचे ठाकरे म्हणाले.
“आम्हाला विचारून कोणताही निर्णय घेऊ नका”; सेनेची केंद्रीय निवडणुक आयोगाकडे धाव
याचबरोबर ते म्हणाले की, राज्य सरकारमध्ये हिम्मत असेल तर मध्यावधी निवडणूक घेऊन दाखवाव्यात. सध्या राज्यात सुरू असलेल्या राजकारणामुळे राज्यात घटनेची पायमल्ली होत आहे. शिवसेनेने बंडखोर आमदारांवर न्यायालयात धाव घेतली आहे. न्यायालयात बंडखोर आमदारांच्या निलंबनाचा प्रश्न प्रलंबित असताना बहुमत चाचणी, विश्वासदर्शक ठराव मांडला जातोय.
“सेनेचे 12 खासदार शिंदे गटात लवकरच सामील होणार”; भाजपच्या आमदाराचं सुचक वक्तव्य
यावेळी शिवसेना उपनेत्या डॉ. नीलम गोऱ्हे म्हणाल्या, पुढील काळात आपण एकजुटीने व ताकतीने काम करायचे आहे. या कठीण काळात आपले नेते उद्धव ठाकरे यांच्यामागे खंबीरपणे उभे राहणे ही आपली जबाबदारी आहे. यावेळी त्या भावनिक झाल्या होत्या.
Read also
- “प्रशासनाला विनाकारण ताण येईल, असं काहीही करू नका”; राज ठाकरेंचं कार्यकर्त्यांना आवाहन
- महाराष्ट्र, मध्यप्रदेश आता गुजरात अन् गोवामध्ये देखील ओबीसीचे राजकीय आरक्षण धोक्यात
- “आगामी निवडणुकांसाठी राष्ट्रावादीचा मोठा निर्णय”; निवडणुकीत २७ टक्के ओबीसी आरक्षण देणार
- “पवारांना माहिती नव्हतं तर ठाकरेंनी मंत्र्यांना गाणी ऐकायला बोलावले होते का?”
- काॅंग्रेसचे 5 आमदार भाजपच्या संपर्कात; काॅंग्रेसलाही बसणार मोठा धक्का