मुंबई : शिवसेनेच्या बंडखोर आमदारांविरोधात सुप्रीम कोर्टात आज सुनावणी झाली. शिंदे गटातील आमदारांना सुप्रीम कोर्टांकडुन दिलासा मिळाला आहे. आज होणारी सुनावणी पुढे ढकलली आहे. याच पाश्वभूमीवर भाजपचे खासदार रामदास तडस यांनी शिवसेनेचे 12 खासदार लवकरच शिंदे गटात येणार असल्याचे सांगितले आहे.
“मुख्यमंत्री म्हणाले तुच जिल्हा प्रमुख”, सेनेतून काढल्यानंतर संतोष बांगर यांनी ठाकरेंना ललकारले
शिवसेनेतील 12 खासदार नाराज आहेत ते खासदार एकनाथ शिंदेंच्या गटात लवकरच सामील होणार आहेत. खासदार किंवा आमदारांच्या मतदारसंघाचा विकास झाला नाही तर नेत्यांमध्ये नाराजी राहते. विकासाच्या दृष्टीने आणि या पुण्यभुमीचे हात बळकट करण्यासाठी, देशाच्या संरक्षणसाठी आणि हिंदूत्व टिकवण्याकरिता एकनाथ शिंदेंच्या गटात 12 खासदार येणार आहेत असं भाजप खासदार रामदास तडस म्हणाले.
पंकजा मुडेंना मंत्रीपद मिळण्यासाठी मुंडे समर्थकांकडून वैद्यनाथाला साकडे
आज शिवसेनेच्या खासदारांची मुंबईमध्ये बैठक घेण्यात आली. या बैठकीला शिवसेनेच्या 19 खासदारांपैकी 9 खासदार उपस्थित होते. याचमुळे शिवसेनेच्या आमदारांनंतर आता खासदार ही एकनाथ शिंदे गटात जाणार असल्याच्या चर्चा सुरू आहेत. राष्ट्रपती पदाच्या उमेदवार द्रौपदी मूर्मू यांना शिवसेना पाठिंबा देण्याबाबत चर्चा करण्यासाठी ही बैठक घेण्यात आली होती. आजच्या बैठकीत याबाबत निर्णय घेण्यात येणार आहे.
“यापेक्षा आणखी मोठा पुरावा कोणता हवा?” बंडखोर आमदारांच्या अपात्रतेच्या निर्णयावर भाजपची प्रतिक्रिया
शिवसेनेचे खासदार राहुल शेवाळे, राजेंद्र गावीत आणि इतर अनेक खासदार द्रौपदी मूर्मू यांना पाठिंबा देण्यासाठी आग्रही आहेत असं बोलले जात होते. 40 बंडखोर आमदारांनंतर खासदारांनाही भाजप सोबत जवळीक करावी अशी अपेक्षा आहे. शिवसेना खासदाराची हिंदूत्ववाचा धागा पकडत भाजप सोबत जाण्याची इच्छा आहे. याबाबत खासदारांनी शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडे आग्रह धरला आहे.
Read also
- “अडीच हजारांची दाढी अन् अडीच हजार रूपयांची कटिंग करणारं असंवेदनशील शिंदे सरकार”
- “फिर कानो में शोर आएगा, तुम्हारा तो सिर्फ वक्त है.. हमारा दौर आएगा”
- शिंदे गटातील आमदार गोगावलेंच्या ताफ्यातील गाड्यांचा अपघात; 7 गाड्या एकमेकांवर आदळल्या
- खंजीर, कोथळा, बंधन, शपथा, प्रतिज्ञापत्रानंतर पक्षप्रमुखांचं शिल्लक आमदारांना ‘प्रेमपत्र’
- “मुख्यमंत्री म्हणाले तुच जिल्हा प्रमुख”, सेनेतून काढल्यानंतर संतोष बांगर यांनी ठाकरेंना ललकारले