मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटातील शिवसेनेचे मुख्य प्रतोद असलेले भरतशेठ गोगावले यांच्या गाडीचा मुंबईत अपघात झाला. सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही. त्यामुळे अपघात झाल्यानंतर भरत गोगावले यांनी लगेचच मंत्रालय गाठले. भरत गोगावले यांची गाडी फ्री वेवरून जात असताना हा अपघात झाला आहे. त्यावेळी फ्री वेवरून जात असलेल्या 8 गाड्या एकमेकांवर धडकल्या आहेत.
“बंडखोर आमदारांवर सध्या कोणतीही कारवाई नको,” सर्वोच्च न्यायालयाचा शिंदे गटाला दिलासा
भरत गोगावले यांना या अपघात कोणतीही दुखापत झाली नाही. मात्र अपघात त्यांच्या गाड्यांचा प्रचंड नुकसान झालं आहे. दोन ते तीन गाड्यांच्या पुढचा पुर्णपणे भाग चेपला गेला आहे. या अपघातानंतर भरत गोगावले मंत्रालयात दाखल झाले आहेत. काही दिवसांपुर्वीच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ताफ्यातील गाडीचाही अपघात झाला आहे. सध्या पावसाळा सुरू असल्याने अनेक ठिकाणी अशा घटना घडताना दिसत आहेत.
“आईच्या दुधाशी बेईमानी करु नका हा निष्ठेचा मंत्र तुम्ही जपला”; ठाकरेंचा 16 आमदारांना भावनिक पत्र
एकनाथ शिंदे हे पावसाच्या स्थितीचा आढावा घेण्यासाठी मुंबई महापालिकेच्या आपत्कालीन कक्षाला भेट जात असताना अपघात झाला होता. यावेळी पालिकेच्या मुख्यालयाजवळच त्यांच्या ताफ्यातील दोन गाड्यांचा अपघात झाला होता. या अपघातात देखील कोणीही जखमी झाले नव्हते. चालकाने तात्काळ आपात्कालीन ब्रेक दाबल्याने हा प्रकार घडला होता. त्यामुळे आता शिंदे गटातील आमदाराचं देखील अपघात झाल्याने अनेकांनी काळजी व्यक्त केली आहे.
“आमच्या घरी आजही शिवसेना प्रमुखांचा फोटो आहे”; बंडखोर आमदार सदा सरवणकरांचं वक्तव्य
दरम्यान, मुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर एकनाथ शिंदे यांनी कामांचा धडाका लावला आहे. पावसाळा सुरू असल्याने अनेक ठिकाणी पुर आल्याने अनेक लोकांना अडचणींचा सामाना करावा लागत आहे. या परिस्थितीचा आढावा खुद्द एकनाथ शिंदे अधिकाऱ्यांना फोन लावून घेत आहेत.
Read also
- खंजीर, कोथळा, बंधन, शपथा, प्रतिज्ञापत्रानंतर पक्षप्रमुखांचं शिल्लक आमदारांना ‘प्रेमपत्र’
- “मुख्यमंत्री म्हणाले तुच जिल्हा प्रमुख”, सेनेतून काढल्यानंतर संतोष बांगर यांनी ठाकरेंना ललकारले
- “मुख्यमंत्री म्हणाले तुच जिल्हा प्रमुख”, सेनेतून काढल्यानंतर संतोष बांगर यांनी ठाकरेंना ललकारले
- पंकजा मुडेंना मंत्रीपद मिळण्यासाठी मुंडे समर्थकांकडून वैद्यनाथाला साकडे
- “यापेक्षा आणखी मोठा पुरावा कोणता हवा?” बंडखोर आमदारांच्या अपात्रतेच्या निर्णयावर भाजपची प्रतिक्रिया