मुंबई : महाराष्ट्रात सध्या अनेक प्रश्न आहेत. सरकार एका विमानातून उतरतं आणि दुसऱ्या विमानात बसतंय. पैशाच्या जोरावर सरकार फाईव्ह स्टारमध्ये अडीच हजार रूपयांची दाढी करतंय. अडीच हजार रूपयांची कटिंग करतंय. यामध्ये सर्वसामान्य माणुस भरडला जातोय. या सरकारला त्यांचं काही घेणं देणं नाही. शिंदे सरकार हे असंवेदनशील असल्याचंही वक्तव्य राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी केलं आहे.
पंकजा मुडेंना मंत्रीपद मिळण्यासाठी मुंडे समर्थकांकडून वैद्यनाथाला साकडे
बाळासाहेब ठाकरे यांनी हयात असताना शिवसेनेचा उतराधिकारी ठरवला होता. बाळासाहेबांच्या निर्णयाविरोधात वेगळं काही करणं म्हणजे त्यांना एकप्रकारे दुखावण्याचं काम आहे. असं म्हणत सुप्रिया सुळे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर निशाणा साधला आहे. काल अजित पवार यांनी देखील त्यांना टोमणा मारला होता. मी फोन करतो पण कॅमेरा लावत नाही, असं म्हणत त्यांनी एकनाथ शिंदे यांच्या व्हायरल झालेल्या व्हिडीओबाबत भाष्य केलं होतं.
“यापेक्षा आणखी मोठा पुरावा कोणता हवा?” बंडखोर आमदारांच्या अपात्रतेच्या निर्णयावर भाजपची प्रतिक्रिया
राज्यातील विविध घटनांबाबत एकनाथ शिंदे यांनी अधिकाऱ्यांना फोनवरून आदेश दिले होते. त्याबाबत त्यांचे काही व्हिडीओ देखील सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. त्याबाबत बोलताना अजित पवार म्हणाले की, आम्ही देखील सरकारमध्ये असताना जनतेची कामे केली होती. पण आम्ही कधीही मी फोन करतो पण कधीही आम्ही कॅमेरा लावत नाही. असा टोला त्यांनी एकनाथ शिंदे यांना लगावला होता.
“बंडखोर आमदारांवर सध्या कोणतीही कारवाई नको,” सर्वोच्च न्यायालयाचा शिंदे गटाला दिलासा
दरम्यान, एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर त्यांनी कामांचा धडाका सुरू केला आहे. महाविकास आघाडीतील अनेक कामांना त्यांनी स्थगिती दिली आहे. त्यावरून देखील अजित पवारांनी एकनाथ शिंदेवर निशाणा साधला आहे.
Read also
- “फिर कानो में शोर आएगा, तुम्हारा तो सिर्फ वक्त है.. हमारा दौर आएगा”
- शिंदे गटातील आमदार गोगावलेंच्या ताफ्यातील गाड्यांचा अपघात; 7 गाड्या एकमेकांवर आदळल्या
- खंजीर, कोथळा, बंधन, शपथा, प्रतिज्ञापत्रानंतर पक्षप्रमुखांचं शिल्लक आमदारांना ‘प्रेमपत्र’
- “मुख्यमंत्री म्हणाले तुच जिल्हा प्रमुख”, सेनेतून काढल्यानंतर संतोष बांगर यांनी ठाकरेंना ललकारले
- “मुख्यमंत्री म्हणाले तुच जिल्हा प्रमुख”, सेनेतून काढल्यानंतर संतोष बांगर यांनी ठाकरेंना ललकारले