मुंबई : मुख्यमंत्री असताना उद्धव ठाकरे यांनी आरे येथील कारशेड प्रकल्पाला स्थगिती दिली होती. त्यानंतर एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर दुसऱ्याच दिवशी त्यांनी या प्रकल्पाला पुन्हा एकदा मंजूरी दिली. यावरून उद्धव ठाकरेंसह सेनेच्या अनेक नेत्यांनी शिंदेंवर निशाणा साधला. तर काल शिवसेनेचे आमदार आणि युवा नेते आदित्य ठाकरे यांनी आरे वाचवा आंदोलन केलं.
खंजीर, कोथळा, बंधन, शपथा, प्रतिज्ञापत्रानंतर पक्षप्रमुखांचं शिल्लक आमदारांना ‘प्रेमपत्र’
आदित्य ठाकरे यांनी पुकारलेल्या आरे आंदोलनात लहान मुलांचा देखील समावेश होता. त्यांनी यासंदर्भात ट्विट देखील केलं होतं. त्यात त्यांनी असं म्हटलं होतं की, आरे हे आपल्या शहारातील एक अनोखे जंगल आहे. उद्धव ठाकरे यांनी आरेतील 808 एकर जमीन वन म्हणून घोषित केली आणि कारशेड बाहेर काढलं. मात्र काही जण लोभांपायी शहरातील जैवविविधता नष्ट करू पाहत आहे. पण आम्ही तसं होऊ देणार नाही.
“मुख्यमंत्री म्हणाले तुच जिल्हा प्रमुख”, सेनेतून काढल्यानंतर संतोष बांगर यांनी ठाकरेंना ललकारले
आरे वाचवा आंदोलनात लहान मुलांचा समावेश असल्यानं राष्ट्रीय बालहक्क आयोगानं मुंबईच्या पोलीस आयुक्तांना नोटीस पाठवली आहे. शिवसेनेचे आमदार आणि युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी नियमांची पायमल्ली केल्याची तक्रार करण्यात आली आहे. यांसदर्भात राष्ट्रीय बाल अधिकार संरक्षण आयोगाचे मुंबई पोलीस आयुक्त विवेक फणसाळकर यांना पत्र पाठवलं आहे. त्याचसोबत आदित्य ठाकरे यांनी शेअर केलेले आंदोलनातील काही फोटो देखील पाठवले आहेत.
“मुख्यमंत्री म्हणाले तुच जिल्हा प्रमुख”, सेनेतून काढल्यानंतर संतोष बांगर यांनी ठाकरेंना ललकारले
याबाबत 3 दिवसात कारवाई करून आरोपी असणाऱ्याविरोधात गुन्हा दाखल करण्याचे निर्देशही देण्यात आले आहेत. आंदोलना प्रथमदर्शनी बाल न्याय कायद्याच्या कलम 75 चे उल्लंंघन झाल्याचा आरोप करण्यात आला आहे. आदित्य ठाकरे यांच्या विरोधात गुन्हा दाखल करून कारवाई करण्याची मागणी सह्याद्री राईट्स फोरम या संस्थेनं केली होती.
Aarey is a unique forest within our city. Uddhav Thackeray ji declared 808 acres of Aarey as Forest and the car shed must move out. Our human greed and lack of compassion cannot be allowed to destroy biodiversity in our city. pic.twitter.com/YNbS0ryd8d
— Aaditya Thackeray (@AUThackeray) July 10, 2022
राष्ट्रीय बाल अधिकार संरक्षण आयोगाचे
मुंबई पोलीस आयुक्त विवेक फणसाळकर यांना पत्र⬇️आणि श्री आदित्यजी ठाकरे यांनी शेयर केलेले आंदोलनातील काही फोटो⬇️ pic.twitter.com/2nkZnl4yqo
— पवन/PAWAN🇮🇳 (@ThePawanUpdates) July 11, 2022
Read also
- “आम्हाला विचारून कोणताही निर्णय घेऊ नका”; सेनेची केंद्रीय निवडणुक आयोगाकडे धाव
- “सेनेचे 12 खासदार शिंदे गटात लवकरच सामील होणार”; भाजपच्या आमदाराचं सुचक वक्तव्य
- “अडीच हजारांची दाढी अन् अडीच हजार रूपयांची कटिंग करणारं असंवेदनशील शिंदे सरकार”
- “फिर कानो में शोर आएगा, तुम्हारा तो सिर्फ वक्त है.. हमारा दौर आएगा”
- शिंदे गटातील आमदार गोगावलेंच्या ताफ्यातील गाड्यांचा अपघात; 7 गाड्या एकमेकांवर आदळल्या