गोवा : महाराष्ट्रातील राजकीय यशस्वी बंडानंतर आता काही दिवसांपासून गोव्यात ही राजकीय बंड होणार असल्याचं म्हटलं जात आहे. गोव्यातील काॅंग्रेसचा निम्मा गट बंड करून भाजपमध्ये जाणार असल्याची माहिती समोर येत आहे. त्यामुळे आता महाराष्ट्रानंतर गोव्यातही भाजपचा प्लॅन यशस्वी ठरणार का ? त्याकडे सगळ्यांचं लक्ष्य लागून राहिलं आहे. यासंदर्भात भाजप नेत्या डॉ. दिव्या राणे यांनी काॅंग्रेसचे आमदार सोबत असल्याचा दावा केला आहे.
शिंदे गटातील आमदार गोगावलेंच्या ताफ्यातील गाड्यांचा अपघात; 7 गाड्या एकमेकांवर आदळल्या
याचबरोबर त्यांना गोव्यातील कॉग्रेस नेत्यांचा मोठा गट फुटतोय आणि तो गट भाजप पक्षात सामील होणार असल्याचे सांगितले जात आहे. यामुळे भाजप गोव्यात मजबूत होईल का? असं त्यांना विचारलं असता त्या म्हणाल्या की, भाजप हा भारतातील सर्वात मजबूत पक्ष आहे. ते भाजप सोबत येणार का? हे कॉग्रेसच्या नेत्यांना आणि पक्षाच्या अध्यक्षांना विचारा असं खासदार राणे म्हणाल्या.
खंजीर, कोथळा, बंधन, शपथा, प्रतिज्ञापत्रानंतर पक्षप्रमुखांचं शिल्लक आमदारांना ‘प्रेमपत्र’
गोव्यातील कॉग्रेस पक्षाचे आमदार काही दिवसांपासून नॉट रिचेबल असल्याचं माध्यमातून बोलले जात आहे. यामुळे पणजी गोव्यात काँग्रेसला मोठा धक्का बसणार आहे. मायकल लोबो यांच्यासह पाच आमदार नॉट रिचेबल आहेत. या घडामोडीं दरम्यान काँग्रेसकडून मायकेल लोबो यांची गोवा विधानसभेतील विरोधी पक्षनेतेपदावरून हकालपट्टी करण्यात आली आहे. तर सोनिया गांधी यांनी गोव्यातील परिस्थिती हातळण्यासाठी मुकूल वासनिक यांना गोव्यात जाण्याच्या सूचना केल्या आहेत.
“मुख्यमंत्री म्हणाले तुच जिल्हा प्रमुख”, सेनेतून काढल्यानंतर संतोष बांगर यांनी ठाकरेंना ललकारले
प्रमोद सावंत म्हणाले की, आम्हाला कोणाचीही गरज नसून आमच्याकडे 25 आमदारांच्या पाठिंब्याचे स्थिर सरकार आहे. काँग्रेसला आता करण्यासारखं काही नाही. त्यामुळे त्यांच्याकडून वेगवेगळे आरोप करण्यात येत असल्याचा दावा सावंत यांनी केला. काँग्रेसचे गोवा प्रभारी दिनेश गुंडू राव म्हणाले, पक्षाचे पाच आमदार यांच्याशी संपर्क झालेला नाही. परंतु एल्टन डी कोस्टा, संकल्प आमोणकर, युरी आलेमाओ, कार्लोस अल्वारेस फरेरा, रुडॉल्फ फर्नांडिस हे पाच आमदार काँग्रेससोबत आहेत. आमदार अलेक्सो सिक्वेरा हे पक्षाच्या नेत्यांच्या संपर्कात असून ते काँग्रेससोबत असल्याचे त्यांनी सांगितले आहे.
Read also
- ‘आरे वाचवा’ आंदोलनात लहान मुलांचा समावेश; बालहक्क आयोगाचं पत्र, ठाकरेंवर कारवाई होणार?
- “आम्हाला विचारून कोणताही निर्णय घेऊ नका”; सेनेची केंद्रीय निवडणुक आयोगाकडे धाव
- “सेनेचे 12 खासदार शिंदे गटात लवकरच सामील होणार”; भाजपच्या आमदाराचं सुचक वक्तव्य
- “अडीच हजारांची दाढी अन् अडीच हजार रूपयांची कटिंग करणारं असंवेदनशील शिंदे सरकार”
- “फिर कानो में शोर आएगा, तुम्हारा तो सिर्फ वक्त है.. हमारा दौर आएगा”