मुंबई : शिवसेनेच्या 40 आमदारांनी बंड केल्यानंतर शिवसेनेत मोठ्या प्रमाणात फुट पडली. त्याच पार्श्वभूमीवर आता मुंबईपासून थेट यवतमाळ पर्यंतच्या पदाधिकाऱ्यांवर शिवसेनेने कारवाई सुरू केली आहे. पक्ष शिस्तीचा भंग केल्याच्या आरोपावरून पदाधिकाऱ्यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आली आहे. शिवसेनेचे बंडखोर आमदार सदा सरवणकर यांनी देखील पक्षातून हाकालपट्टी करण्याअगोदर शिवसेना विभागप्रमुख पदाचा राजीनामा दिला आहे. सोबत नऊ पदाधिकाऱ्यांनीही राजीनामे दिले आहेत. महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सदा सरवणकर यांनी पदाचा राजीनामा दिल्याने शिवसेनेची चांगलीच कोंडी झाली आहे. यामुळे उद्धव ठाकरे यांची डोकेदुखी वाढली आहे.
महाराष्ट्र, मध्यप्रदेश आता गुजरात अन् गोवामध्ये देखील ओबीसीचे राजकीय आरक्षण धोक्यात
याव्यतिरिक्त शिवसेनेने पालघर जिल्हा संपर्कप्रमुख रवींद्र फाटक आणि पालघर जिल्हाप्रमुख राजेश शहा यांचीही पक्षातून हकालपट्टी करण्यात आली आहे. विशेष म्हणजे एकनाथ शिंदे यांनी बंड केल्यानंतर त्यांची समजूत काढण्यासाठी मिलिंद नार्वेकर सुरतला गेले होते. नार्वेकरांसोबत जाणारे रवींद्र फाटक होते. आज फाटक यांचीच शिवसेनेतून हकालपट्टी करण्यात आल्याने आश्चर्य व्यक्त केलं जात आहे.
“आगामी निवडणुकांसाठी राष्ट्रावादीचा मोठा निर्णय”; निवडणुकीत २७ टक्के ओबीसी आरक्षण देणार
बंडखोर आमदार सदा सरवणकर यांच्यासोबत तीन शाखाप्रमुख शाखा समन्वयक, उफविभाग समन्वयक, दोन महिला शाखा संघटक आणि एका महिला उपविभाग समन्वयकाने पदाचा राजीनामा दिला आहे. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडे हे राजीनामे पाठवण्यात आले आहेत. दादर, प्रभादेवी, माटुंगा आणि माहीम परिसरात सरवणकर यांचं मोठ्या प्रमाणात वर्चस्व आहे. त्यामुळे आता सेनेला त्याठिकाणी मोठा धक्का बसला आहे.
“पवारांना माहिती नव्हतं तर ठाकरेंनी मंत्र्यांना गाणी ऐकायला बोलावले होते का?”
राजीनामा देणाऱ्या पदाधिकारऱ्यांची नावे पुढीलप्रमाणे-
सदा सरवणकर – विभागप्रमुख
मिलिंद तांडेल – शाखाप्रमुख
संदीप देवळेकर – शाखाप्रमुख
संतोष तेलवणे – शाखाप्रमुख
अजय कुसूम – शाखा समन्वयक
कुणाल वाडेकर – उपविभाग समन्वयक
अरुंधती चारी – महिला शाखासंघटक
मंदा भाटकर – शाखा संघटक
शर्मिला नाईक – महिला उपविभाग समन्वयक
Read also
- “द्रौपदी मूर्मूंना पाठिंबा दिला म्हणजे भाजपला नाही”; राऊतांनी भाजपला डिवचलं
- “आमच्याकडे एकनाथ खडसेंसारखा नेता”; विधान परिषदेच्या विरोधी पदासाठी सेना, राष्ट्रवादीमध्ये चुरस
- “तुमच्याकडे फक्त सहा महिन्याचं आयुष्य, शरद पवारांनी पैज लावली अन् ती जिंकलीही”
- “माझ्याकडे तुम्हाला देण्यासाठी काहीही नाही, परंतु मला तुमची ताकद हवीय”
- “प्रशासनाला विनाकारण ताण येईल, असं काहीही करू नका”; राज ठाकरेंचं कार्यकर्त्यांना आवाहन