मुंबई : उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांच्यातील राजकीय संघर्ष थांबता थांबेना झाला आहे. कारण शिवसेनेच्या गळती सत्र अजूनही सुरूच आहे. काल मुंबई येथील दहिसर विभागातील माजी नगरसेविका शीतल मुकेश म्हात्रे यांनी सेनेला सोडचिठ्ठी देत एकनाथ शिंदे यांच्या गटात सामील झाली. तरी देखील शिवसेनेच्या नेत्या दिपाली सय्यद यांना आशा आहे की उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांनी परत एकत्र यावे. त्यासंदर्भात त्यांनी एक ट्विट देखील केलं आहे.
भाजप नेत्याचा हॉटेलमधील महिलेसोबतचा वादग्रस्त व्हिडीओ व्हायरल; तात्काळ पदावरून काढलं
द्रौपदी मुर्मू एक आदिवासी समाजाचे नेतृत्व म्हणुन उद्धव साहेबांनी त्यांना पाठिंबा दिला आहे. तश्याच प्रकारचा पाठिंबा आदरणीय शिंदेसाहेबांना एक मराठा समाजाचे नेतृत्व म्हणुन मिळावे या करीता शिंदेसाहेबांनी मातेश्रीवर येऊन चर्चा सुरू करावी याकरीता आज भेट होईल. अशी आशा त्यांनी व्यक्त केली आहे.
पाहिला.. पाहिला.. पाहिलो वो, माझा देव कुणी पाहिला; चिमुकल्याला फडणवीसांची भुरळ
शिवसेनेतील खासदारांच्या मागणीवरून काल उद्धव ठाकरे यांनी एनडीएच्या राष्ट्रपती पदाच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू यांना पाठिंबा जाहीर केला. अलिकडेच झालेल्या शिवसेनेतील खासदारांच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. यावेळी शिवसेनेचे जवळपास 10 खासदार गैरहजर होते.
साहेब तुमच्या पत्राने शंभर हत्तीचं बळ मिळालंय; आमदार राहुल पाटलांचे उद्धव ठाकरेंना पत्र
दरम्यान, पक्षविरोधी कायवाया केल्याचा ठपका ठेऊन उद्धव ठाकरे यांनी अनेक पदाधिकाऱ्यांना शिवसेनेतून बाहेरचा रस्ता दाखवला आहे. यामध्ये अनेक आमदार, नगरसेवक, जिल्हाप्रमुख, नगरसेवकांचा समावेश आहे. या सर्वांनी एकनाथ शिंदे यांच्या बाजूने मत व्यक्त केल्याने त्यांची पक्षातून हाकालपट्टी करण्यात आली आहे.
मा.द्रोपती मुर्मू एक आदिवासी समाजाचे नेतृत्व म्हणुन उद्धव साहेबांनी त्यांना पाठिंबा दिला आहे तश्याच प्रकारचा पाठिंबा आदरणीय शिंदेसाहेबांना एक मराठा समाजाचे नेतृत्व म्हणुन मिळावे या करीता शिंदेसाहेबांनी मातेश्रीवर येऊन चर्चा सुरू करावी याकरीता आज भेट होईल. @ShivSena
— Deepali Sayed (@deepalisayed) July 13, 2022
Read also
- “सत्ता नसलेला काळ हा समाधान देणारा, माझा व्यक्तिगत अनुभव;”शरद पवार
- आघाडी सरकारने ओबीसी आरक्षणाची पायाभरणी घालून दिली असताना आता दिरंगाई कशासाठी ?
- “राज्यात मोठी फाटाफूट झाली तरी राष्ट्रवादीचा एकही आमदार फुटला नाही, याचा अभिमान”
- कोर्टाच्या निर्णयामुळे ओबीसींना दिलासा; आरक्षण मिळणारच भुजबळांना खात्री
- कोर्टाच्या निर्णयामुळे ओबीसींना दिलासा; आरक्षण मिळणारच भुजबळांना खात्री