मुंबई : राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांमधील ओबीसींच्या आरक्षणावर सुप्रीम कोर्टात आज सुनावणी झाली. या सुनावणीत सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर कोणत्याही निवडणुका घेऊ नका असे आदेश सर्वोच्च न्यायालायने राज्यांना दिले आहेत. यासंदर्भातील पुढील सुनावणी ही 19 तारखेला होणार आहे. त्यानंतर न्यायालयाने याचिकेवर निर्णय होईपर्यंत नव्याने निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर करण्यास निवडणुक आयोगाला मनाई केली आहे. कोर्टाच्या निर्णयामुळे ओबीसींना दिलासा मिळाला आहे असं राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांनी म्हटले आहे. त्यातच आता यावर काॅंग्रेसने देखील आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.
साहेब तुमच्या पत्राने शंभर हत्तीचं बळ मिळालंय; आमदार राहुल पाटलांचे उद्धव ठाकरेंना पत्र
“राज्यातील नगरपालिका, नगरपरिषदांचा निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला असून अद्याप ओबीसींच्या राजकीय आरक्षणाचा निर्णय झालेला नाही. ओबीसी आरक्षणाची पायाभरणी महाविकास आघाडी सरकारने केलेली आहे. बांठिया आयोगाचा अहवालही सादर झाला आहे. परंतु भाजपा प्रणित सरकारला सुप्रीम कोर्टात योग्य बाजू मांडणे जमलेले दिसत नाही. मविआ सरकारने ओबीसी आरक्षणाची पायाभरणी घालून दिली असताना आता दिरंगाई कशासाठी ?” असा सवाल महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी विचारला आहे.
“पवार साहेबांनी भाजपचा अश्वमेध रोखला”
19 तारखेला होणाऱ्या निकालावरून पुढील कारवाई करण्यात येणार आहे. नक्कीच ओबीसींना दिलासा मिळाला आहे. नगरपालिका निवडणुकीत निश्चित ओबीसींना आरक्षण मिळेल असा विश्वास आहे. असं राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ म्हणाले. याचबरोबर भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी राज्यातील होणाऱ्या निवडणूकांना तात्काळ स्थगिती द्यावी अशी मागणी केली आहे. 92 ठिकाणी नगरपालिकेच्या निवडणूका होणार आहेत या निवडणुका राजकीय आरक्षणातच झाल्या पाहिजेत.
“वेळ पडली तर मंत्र्यांच्या गाड्या देखील फोडू”; ओबीसी संघटनेने सरकारला दिला इशारा
निवडणुकांना स्थगिती देण्यासाठी अनेक कारणे आहेत. अतिवृष्टी, महापुर अशी अनेक गंभीर कारणे आहेत पण ओबीसी आरक्षण हेही तितकेच गंभीर कारण आहे. ही सर्व कारणे समोर ठेवून निवडणुका स्थगित केल्या पाहिजेत. मागच्या सरकारने वेळोवेळी विश्वास दिला पण आता आमचे सरकार आल्याने आमचा विश्वास दुणावला आहे हे सरकार ओबीसींच्या हिताचे आहे. आरक्षण देण्याची त्यांची मानसिकता आहे असं पंकजा मुंडे म्हणाल्या.
Read also
- “राज्यात मोठी फाटाफूट झाली तरी राष्ट्रवादीचा एकही आमदार फुटला नाही, याचा अभिमान”
- कोर्टाच्या निर्णयामुळे ओबीसींना दिलासा; आरक्षण मिळणारच भुजबळांना खात्री
- कोर्टाच्या निर्णयामुळे ओबीसींना दिलासा; आरक्षण मिळणारच भुजबळांना खात्री
- भाजप नेत्याचा हॉटेलमधील महिलेसोबतचा वादग्रस्त व्हिडीओ व्हायरल; तात्काळ पदावरून काढलं
- पाहिला.. पाहिला.. पाहिलो वो, माझा देव कुणी पाहिला; चिमुकल्याला फडणवीसांची भुरळ