सोलापुर : भाजपचे सोलापुरचे जिल्ह्याध्यक्ष श्रीकांत देशमुख यांचा एक वादग्रस्त व्हिडीओ सध्या सोशल मिडीयावर व्हायरल होत आहे. त्यानंतर त्यांनी आपल्या सोलापुर जिल्ह्याध्यक्ष पदाचा राजीनामा दिला. त्यानंतर तात्काळ भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी त्यांचा राजीनामा स्विकारला. यानंतर समाजमाध्यामांवर नागरिकांच्या वाईट प्रतिक्रिया उमटू लागल्या. तसेच यावर भाजप नेत्या चित्रा वाघ कारवाई करण्याची मागणी करणार का? असा सवाल देखील उपस्थित केला जात होता. त्यावर आता चित्रा वाघ यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.
कोर्टाच्या निर्णयामुळे ओबीसींना दिलासा; आरक्षण मिळणारच भुजबळांना खात्री
हॉटेल मध्ये एका महिलसोबत व्हिडीओ क्लिप व्हायरल झाल्यानंतर श्रीकांत देशमुख यांना भाजपने लगेच पदावरून हटवलं. त्यानंतर त्यांच्या जागी सोलापुर ग्रामीण तात्पुरता पदभार शहाराध्यक्ष विक्रम देशमुख यांच्याकडे सुपुर्द केला. यानंतर श्रीकांत देशमुख यांच्यावर कारवाई करण्याची मागणी करणार का ? असा सवाल उपस्थित केला. त्यावर चित्रा वाघ म्हणाल्या की, भाजप सोलापुर माजी जिल्हाध्यक्ष श्रीकांत देशमुख यांच्या संदर्भातला व्हिडीओ समोर आलाय. यातील जी संबंधीत ताई आहे. तिने तात्काळ पोलिसात तक्रार द्यावी. योग्य कारवाई होईलंच प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी तात्काळ दखल घेत त्यांना पदावरून मुक्त केलं आहे. असंही त्यांनी म्हटलं आहे.
भाजप नेत्याचा हॉटेलमधील महिलेसोबतचा वादग्रस्त व्हिडीओ व्हायरल; तात्काळ पदावरून काढलं
श्रीकांत देशमुख यांनी दीड वर्षापूर्वी जिल्ह्याध्यक्षपदाची सुत्रे स्वीकारली होती. मात्र आता त्यांना वादग्रस्त व्हिडीओ क्लिप व्हायरल झाल्यानंतर त्यांना तात्काळ राजीनामा देण्याचा आदेश पक्षाकडून देण्यात आला. व्हायरल झालेल्या व्हिडीओ मध्ये एका महिलेने श्रीकांत देशमुख यांच्यावर धक्कादायक आरोप केले आहेत. श्रीकांत देशमुख यांनी माझ्यासोबत शारीरीक संबंध ठेवलं असल्याचं त्या व्हिडीओमध्ये म्हटलं आहे.
पाहिला.. पाहिला.. पाहिलो वो, माझा देव कुणी पाहिला; चिमुकल्याला फडणवीसांची भुरळ
श्रीकांत देशमुख यांनी त्याच्या बायकोसोबत संंबंध ठेऊन माझ्याशी शारीरीक संबंध ठेवले आहेत. तसेच तो माझ्याशी लग्न करणार असल्याचं त्या महिलेने म्हटलं आहे. त्यानंतर श्रीकांत देशमुख यांनी त्या महिलेचा कॅमेरा हिसकावा असल्याचं त्या व्हिडीओ मध्ये दिसत आहे.
Read also
- “एकनाथ शिंदे अन् उद्धव ठाकरेंची मातोश्रीवर आज भेट” शिवसेना नेत्याची माहिती
- “सत्ता नसलेला काळ हा समाधान देणारा, माझा व्यक्तिगत अनुभव;”शरद पवार
- आघाडी सरकारने ओबीसी आरक्षणाची पायाभरणी घालून दिली असताना आता दिरंगाई कशासाठी ?
- “राज्यात मोठी फाटाफूट झाली तरी राष्ट्रवादीचा एकही आमदार फुटला नाही, याचा अभिमान”
- कोर्टाच्या निर्णयामुळे ओबीसींना दिलासा; आरक्षण मिळणारच भुजबळांना खात्री