मुंबई : महाराष्ट्रातील राजकीय परिस्थिती सध्या अत्यंत टोकावर पोहचली आहे. राजकीय नेते एकमेकांवर चिखलफेक करण्यात कोणतीही कसर सोडत नाही. तसेच राज्यात फोडाफोडीचं राजकारण सुरू आहे. राज्यात हे सुरू असताना नासाने जेम्स वेब दुर्बिणीनं विश्वाच्या एका टोकाची छायाचित्रे काढली आहेत. यावरून मनसेचे नेते अनिल शिदोरे यांनी राज्यातील राजकारण्यांना यावरून फटकारलं आहे.
कोर्टाच्या निर्णयामुळे ओबीसींना दिलासा; आरक्षण मिळणारच भुजबळांना खात्री
मराठी वृत्तपत्रं आणि माध्यमांना विनंती की ज्ञानाच्या क्षेत्रात जगात अदभुत गोष्टी घडत असतात. जसं की जेम्स वेब्ब दुर्बिणीनं विश्वाच्या एका टोकाची काढलेली छायाचित्रं. अशांचंही वृत्तांकन मराठीत यावं.. किती दिवस आपण फक्त खड्डे, पूर, गेलेले आमदार, आलेले खासदार ह्याची चर्चा करत बसणार? असा सवाल देखील त्यांनी उपस्थित केला आहे.
कोर्टाच्या निर्णयामुळे ओबीसींना दिलासा; आरक्षण मिळणारच भुजबळांना खात्री
तसेच त्यांनी पुढं असं म्हटलं आहे की, असं म्हणतात की नासानी बसवलेल्या जेन्स वेब्ब दुर्बिणीनं जगाच्या, विश्वाच्या, ब्रह्मांडाच्या फार दूरची छायाचित्रं काढली आहेत.. त्यातलं हे पहिलं चित्र… म्हणतात की १३०० कोटी प्रकाशवर्ष इतक्या दूरची ही चित्रं आहेत.. किती अदभुत आहे हे ! अजून शोधा खूप विस्मयकारक आहे हे ! असं आश्चर्य देखील त्यांनी व्यक्त केलं आहे.
भाजप नेत्याचा हॉटेलमधील महिलेसोबतचा वादग्रस्त व्हिडीओ व्हायरल; तात्काळ पदावरून काढलं
दरम्यान, गेल्या काही दिवसापासून राज्यातील राजकीय परिस्थिती खुप वाईट झालेली बघायला मिळाली आहे. राजकीय नेते एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करताना दिसत आहेत. यामध्ये मात्र सर्वसामान्यांच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष होताना दिसत आहे. त्यामुळे राजकीय नेत्यांवर नागरिकांचा सध्या प्रंचड रोष आहे.
मराठी वृत्तपत्रं आणि माध्यमांना विनंती की ज्ञानाच्या क्षेत्रात जगात अदभुत गोष्टी घडत असतात. जसं की जेम्स वेब्ब दुर्बिणीनं विश्वाच्या एका टोकाची काढलेली छायाचित्रं.. अशांचंही वृत्तांकन मराठीत यावं.. किती दिवस आपण फक्त खड्डे, पूर, गेलेले आमदार, आलेले खासदार ह्याची चर्चा करत बसणार?
— Anil Shidore अनिल शिदोरे (@anilshidore) July 13, 2022
Read also
- भाजप नेत्याचा हॉटेलमधील महिलेसोबतचा वादग्रस्त व्हिडीओ व्हायरल; चित्रा वाघ म्हणाल्या…;
- “एकनाथ शिंदे अन् उद्धव ठाकरेंची मातोश्रीवर आज भेट” शिवसेना नेत्याची माहिती
- “सत्ता नसलेला काळ हा समाधान देणारा, माझा व्यक्तिगत अनुभव;”शरद पवार
- आघाडी सरकारने ओबीसी आरक्षणाची पायाभरणी घालून दिली असताना आता दिरंगाई कशासाठी ?
- “राज्यात मोठी फाटाफूट झाली तरी राष्ट्रवादीचा एकही आमदार फुटला नाही, याचा अभिमान”