मुंबई : शिवसेनेच्या माजी नगरसेविका शीतल म्हात्रे यांनी काल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेत शिंदे गटात प्रवेश केला. त्यानंतर त्यांची शिवसेनेतुन त्यांची तात्काळ हकालपट्टी करण्यात आली. त्यांच्यावर पक्षाच्या विरोधात कारवाया केल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे.
“सत्ता नसलेला काळ हा समाधान देणारा, माझा व्यक्तिगत अनुभव;”शरद पवार
शिंदे गटात जाणाऱ्या त्या मुंबईतील पहिल्याच नगरसेविका आहेत. काही दिवसापुर्वी शीतल म्हात्रे यांनी शिंदे गटावर टीका केली होती. शिंदे गटाला धडा शिकवणारच असं जाहीर वक्तव्यही त्यांनी केली होती. आता त्याच शिंदे गटात सामील झाल्याने अनेकांना आश्चर्याचा धक्काच बसला आहे.
आघाडी सरकारने ओबीसी आरक्षणाची पायाभरणी घालून दिली असताना आता दिरंगाई कशासाठी ?
शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशानंतर महिला उपविभाग संघटक गौरी खानविलकर यांनी पक्षविरोधी कारवाई केल्यामुळे हकालपट्टी केली असल्याचं स्पष्ट केले आहे. याआधी शिंदे गटात ठाणे, नवी मुंबई, कल्याण डोंबवली आणि उल्हासनगरमधील नगरसेवक सामील झाले होते. शिवसेनेतुन अजुन किती नेते शिंदे गटात सामील होणार याकडे लक्ष असणार आहे.
“राज्यात मोठी फाटाफूट झाली तरी राष्ट्रवादीचा एकही आमदार फुटला नाही, याचा अभिमान”
शिवसेनेत गळाचेपी होत असल्याने आपण हा निर्णय घेतला आहे असं शीतल म्हेत्रे यांनी सांगितलं आहे. शिंदे गटाच्या बंडानंतर मी सुद्धा एका शिवसैनिकाप्रमाणे वागले. आम्हाला सुद्धा वाईट वाटलं. बंड का आणि कसा झाला? असा प्रश्न मलाही पडला होता. त्यामुळे मी ही शिंदे गाटावर टीका केली. जेव्हा मुख्यमंत्री एकनाथ शिंदेची भुमिका ऐकली तेव्हा हेच आमचंही दुखणं आहे असं वाटलं. बाळासाहेबांचे विचार आणि हिंदुत्वाचे विचार पुढे घेऊन जावं हे प्रत्येक शिवसैनिकाला वाटतं. पण वरिष्ठांनी आमची भुमिका पक्षप्रमुखांपर्यंत पोहचवलीच नाही. ही माझ्यासोबत प्रत्येक शिवसेनेच्या नगरसेवकाची वेदना आहे असंही त्या म्हणाल्या.
Read also
- “शिवसेना फोडण्यात राष्ट्रवादीचा मोठा हात”; दिपक केसरकरांचा शरद पवारांवर गंभीर आरोप
- “बाळासाहेब असते तर अशा लोकांना त्यांनी त्यांच्या स्टाईलने फटकारलं असतं”
- किती दिवस फक्त खड्डे, पूर, गेलेले आमदार, खासदार ह्याची चर्चा करत बसणार?
- भाजप नेत्याचा हॉटेलमधील महिलेसोबतचा वादग्रस्त व्हिडीओ व्हायरल; चित्रा वाघ म्हणाल्या…;
- “एकनाथ शिंदे अन् उद्धव ठाकरेंची मातोश्रीवर आज भेट” शिवसेना नेत्याची माहिती