मुंबई : राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांमधील ओबीसींच्या आरक्षणावर सुप्रीम कोर्टात सुनावणी झाली. ट्रिपल टेस्टचा निकष पूर्ण करण्यात आल्याचा दावा राज्य सरकारकडून न्यायालयात करण्यात आला. त्यानंतर न्यायालयाने याचिकेवर निर्णय होईपर्यंत नव्याने निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर करण्यास मनाई केली. त्यामुळे कोर्टाने सुनावणीची तारीख पुढे ढकलली आहे. याच पार्श्वभूमीवर आता प्रभागरचनावरून काॅंग्रेसने आधीची प्रभाग रचना रद्द करा अशी मागणी केली आहे.
“एकनाथ शिंदे अन् उद्धव ठाकरेंची मातोश्रीवर आज भेट” शिवसेना नेत्याची माहिती
महाविकास आघाडी सरकार असताना प्रभाग रचना ही स्वत: च्या फायद्याची असल्याची टिका काॅंग्रेसने शिवसेनेवर केली होती. तसेच काॅंग्रेसने पुण्यातील महापालिका प्रभाग रचना वरून राष्ट्रवादीवर देखील निशाणा साधला होता. अशातच आज प्रभागरचना सोडत एकाच पक्षाच्या फायद्याची आहे. त्यामुळे प्रभाग रचना तातडीने बरखास्त करा अशी मागणी काॅंग्रेसने केली आहे.
“सत्ता नसलेला काळ हा समाधान देणारा, माझा व्यक्तिगत अनुभव;”शरद पवार
महाराष्ट्रात शिवसेना, राष्ट्रवादी आणि कॉग्रेसने एकत्र येत महाविकास आघाडी स्थापन केली होती. सरकार पडल्यानंतर तिन्ही पक्ष येणाऱ्या निवडणुका एकत्रित सामोरे जाणार का? असाही प्रश्न उपस्थित होत आहे. त्याचबरोबर 92 नगरपालिका निवडणुकाच्या तारखा निवडणुक आयोगाने जाहीर केल्या आहेत. या निवडणुकांमध्ये मुंबईत प्रभाग रचना सोडत रद्द करा अशी मागणी कॉग्रेसने केली आहे.
Read also
- शिंदे गटाला धडा शिकवणारच, असं जाहीर वक्तव्य करणाऱ्या सेनेच्या नेत्याचा 2 दिवसात शिंदेंना पाठिंबा
- “शिवसेना फोडण्यात राष्ट्रवादीचा मोठा हात”; दिपक केसरकरांचा शरद पवारांवर गंभीर आरोप
- “बाळासाहेब असते तर अशा लोकांना त्यांनी त्यांच्या स्टाईलने फटकारलं असतं”
- किती दिवस फक्त खड्डे, पूर, गेलेले आमदार, खासदार ह्याची चर्चा करत बसणार?
- भाजप नेत्याचा हॉटेलमधील महिलेसोबतचा वादग्रस्त व्हिडीओ व्हायरल; चित्रा वाघ म्हणाल्या…;