मुंबई : एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेऊन जवळपास 2 आठवड्याचा कालावधी उलटला आहे. तरीदेखील इतर मंत्र्यांचा शपथविधी करण्यात आला नाही. त्यामुळे भाजप-सेनेत नेमकं काय चाललंय? असा सवाल उपस्थित केला जात आहे. तर आधी फोन कोणी करावा यावरून शिवसेना-भाजप युतीचा खोळंबा झाला असल्याचं वक्तव्य शिंदे गटातील प्रवक्ते दिपक केसरकर यांनी म्हटलं आहे.
उस बिलासाठी मालमत्ता गहाण ठेवली, आता थेट कारखान्याच्या अध्यक्षपदी निवड
मी एकनाथ शिंदे यांचा प्रवक्ता आहे. त्यामुळे शिवसेना खासदारांचा गोष्टी सांगण्याचा मला अधिकार नाही. ज्या दिवशी खासदार म्हणतील आमच्यावतीनं तुम्ही बोला तेव्हा मी बोलेन. पण मला सांगण्यात आलं होतं की, युतीचं सगळं मानपानावर अडलं आहे. आधी फोन कोणी करावा यावरून शिवसेना भाजप युतीचा खोळंबा झालाय. हा वाद मातोश्री आणि भाजपमधील असून आमच्यामधील नाही. असंही देखील ते म्हणाले.
“मरायच्या आधी तुझा काळ बनणार, फडणवीसांना सर्व सांगणार”; भाजप नेत्याची ऑडिओ क्लिपही व्हायरल
गुवाहटीतूनही उद्धव ठाकरे यांना शिंदे आणि 50 आमदारांच्यावतीनं सांगितलं होतं की, तुम्ही राष्ट्रवादी काॅंग्रेससोबतची आघाडी तोडा आम्ही सर्वजण लगेच महाराष्ट्रात येतो. पण त्यांनी तसं केलं नाही. पण आता अनायसे त्यांची आघाडी तुटल्यातच जमा आहे. ठाकरेंना आम्ही हे देखील सांगितलं होतं की, उद्या जेव्हा आम्ही भाजपसोबत जाण्याचा निर्णय घेऊ तेव्हा हा आमच्या एकट्याचा विचार नसेल त्यावर आपल्याला सामुहिक विचार करावा लागेल. मग त्यावेळी तुम्हाला भाजपसोबत जावं लागेल. असंही त्यांनी म्हटलं आहे.
केसरकर हे उडते पंछी; इकडनं उड, तिकडे बस; पेडणेकरांची दिपक केसरकरांवर खोचक टिका
दरम्यान, एनडीएच्या राष्ट्रपती पदाच्या उमेदवार दौपद्री मुर्मु आज मुंबई दौऱ्यावर येत आहे. याठिकाणी त्या आमदार, खासदारांशी संवाद साधणार आहेत. उद्धव ठाकरे यांनी देखील दौपद्री मुर्मु यांना पाठिंबा जाहीर केला आहे. तसेच आम्ही दौपद्री मुर्मु यांना पाठिंबा दिला असून तो पाठिंबा भाजपला समजू नका, त्या एक आदिवासी महिला आहेत. आम्ही नेहमी अशा व्यक्तींना पाठिंबा देत आलो आहे. असं वक्तव्य संजय राऊतांनी केलं आहे.
Read also
- “ज्या ताटात जेवलात, त्यातच थुंकायचे हे कुठून शिकलात”? आव्हाडांचा केसरकरांना टोला
- “सरकार बेकायदेशीर, केसरकर तुम्ही सुद्धा बेकायदेशीर प्रवक्ते”
- मुंबई महापालिकेवर राष्ट्रवादीचा झेंडा फडकाविण्याची संधी, तयार रहा; शरद पवार
- “शिवसेनेचं धनुष्यबाण एकनाथ शिंदेंना द्यावं;” रामदास आठवलेंचं वक्तव्य
- मुख्यमंत्र्यांच्या स्थानिक शिष्याची मोठी शिष्टाई, गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने बदली नकोचा आग्रह