मुंबई : नारायण राणे यांना शिवसेनेतून बाहेर पडण्यासाठी राष्ट्रवादी काॅंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी मदत केली होती. त्याचबरोबर राज ठाकरे यांच्यापाठीमागे देखील त्यांचाच हात असल्याचा आरोप शिंदे गटातील प्रवक्ते दिपक केसरकर यांनी केलं आहे. यावर आता राष्ट्रवादी काॅंग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी दिपक केसरकरांवर निशाणा साधला आहे.
“मरायच्या आधी तुझा काळ बनणार, फडणवीसांना सर्व सांगणार”; भाजप नेत्याची ऑडिओ क्लिपही व्हायरल
अहो केसरकर.. किती बोलता पवार साहबांविरुद्ध एके काळी साहेबांनी अनेकांना नाराज करत तुम्हाला सिंधुदुर्ग आणि गोव्यात हाताला धरून फिरवले. ज्या ताटात जेवलात त्यातच थुंकायचे हे कुठून शिकलात. 2014 ला मीच आलो होतो. साहेबांचा निरोप घेऊन जिथे आहात तिथे सुखी राहा खाजवून खरूज काढू नका. असा टोला जितेंद्र आव्हाड यांनी दिपक केसरकरांना लगावला आहे.
केसरकर हे उडते पंछी; इकडनं उड, तिकडे बस; पेडणेकरांची दिपक केसरकरांवर खोचक टिका
दिपक केसरकरांचं वक्तव्य अतिशय बेजबाबदार आहे. दिपक केसरकरांना शिवसेनेचा इतिहास माहिती नसावा. त्या काळात जे लोक शिवसेनेतून बाहेर पडले. त्याची कारणं केसरकरांना माहिती नसावीत. शरद पवार आणि बाळासाहेब ठाकरे यांचे संबंध किती मधूर होते. हे केसरकरांना माहिती नाही. असं राष्ट्रवादीचे प्रवक्ते महेश तपासे यांनी म्हटलं आहे.
प्रभाग रचनेवरून काॅंग्रेसने शिवसेनेला घेरलं; थेट पत्रचं पाठवलं
2014 मध्ये महाराष्ट्रात भाजपचं सरकार स्थापन झालं. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाले. त्यावेळी साधं शपथविधीचं निमंत्रणही शिवसेनेला देण्यात आलं नव्हतं. मात्र त्यच शिवसेनेतून बंडखोरी करणारे आमदार, मुख्यमंत्री, प्रवक्ते आज भाजपसमोर लोटांगण घालत आहेत. खऱ्या अर्थाने बाळासाहेबांना अश्रू आणि वेदना देणारी कृती केसरकर आणि शिंदे गटाने केली आहे. याच्याशी शरद पवारांचा संबंध नसल्याचंही ते म्हणाले.
Read also
- “सरकार बेकायदेशीर, केसरकर तुम्ही सुद्धा बेकायदेशीर प्रवक्ते”
- मुंबई महापालिकेवर राष्ट्रवादीचा झेंडा फडकाविण्याची संधी, तयार रहा; शरद पवार
- “शिवसेनेचं धनुष्यबाण एकनाथ शिंदेंना द्यावं;” रामदास आठवलेंचं वक्तव्य
- मुख्यमंत्र्यांच्या स्थानिक शिष्याची मोठी शिष्टाई, गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने बदली नकोचा आग्रह
- उस बिलासाठी मालमत्ता गहाण ठेवली, आता थेट कारखान्याच्या अध्यक्षपदी निवड