मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते आणि ठाकरे सरकारमधले सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांच्यामागचे शुक्लकाष्ठ काही थांबण्याचे नाव घेत नाहीये. यावेळी धंनजय मुंडे यांच्या दुसऱ्या पत्नी असलेल्या करुणा धनंजय मुंडे यांनी फेसबुकवर एक व्हिडीओ शेअर करून मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंकडे धनंजय मुंडेंची तक्रार केली आहे.गोष्ट इथेच थांबत नाही तर त्यांनी चक्क धनंजय मुंडे यांच्या संपूर्ण संपत्तीचा लेखाजोखाच जाहीररीत्या मांडला आहे.
@dhananjay_munde @PMOIndia @supriya_sule @Dev_Fadnavis @TimesNow pic.twitter.com/VKXMbsjXmt
— karuna dhananjay munde (@munde_karuna) May 18, 2021
“धनंजय मुंडे सध्या मंत्री आहेत. पण जेव्हा माझे पती विधानपरिषदेत आमदार होते, तेव्हा परळीत ३ बंगले, १ फार्म हाऊस, पुण्यात २ मोठ बंगले आणि मुंबईला आमचे २ मोठ फ्लॅट आहेत. नरीमन पॉईंटला एक तर एक सांताक्रूझला. नंतर आम्हाला सरकारी बंगला देखील मिळाला. मुंडे जेव्हा आमदार होते, हे सारं तेव्हाच मिळवलं आहे. त्यामुळे मी राज्य सरकारला हात जोडून विनंती करत आहे, आमदार निवासासाठी ९०० कोटी रुपये का खर्च करावेत? त्या बदल्यात पोलिसांच्या वस्त्या नवीन बनवा, दुरुस्त करा”, असा सल्ला त्यांनी दिला आहे.
तसेच, “मुंबईमध्ये अजूनही काही ठिकाणी बोटीतून दूर जाऊन पाणी आणावे लागते. झोपडपट्टी भागात सुविधांची वानवा आहे. या आमदार निवासावरचा पैसा त्यासाठी खर्च करा, असे आवाहन करत त्यांनी केले आहे. यावेळी त्यांनी आदित्य ठाकरेंच्या नावाचा उल्लेख करत, आदित्य ठाकरेंनी ३ हजार ६०० कोटी रुपये मंत्र्यांच्या बंगल्याच्या पुनर्बांधणीसाठी दिले आहेत. त्यांना माझे सांगणे आहे, असे बंगले पाडून पुन्हा बांधायची गरज नाही. मालाडमध्ये २० बाथरुम बांधून तयार आहेत, बंद असलेल्या त्या बाथरुमचे टाळे खोला. तेथील बाथरूम जाऊन मुख्यमंत्र्यांनी पहावेत, त्या पाहून मला चक्कर आली. त्यामुळे आमदार निवासावर पैसे खर्च करू नका.” असे आवाहन त्यांनी कले आहे.
नेमकं काय म्हणाल्या करुणा धंनजय मुंडे…
Read Also :