मुंबई : उत्तर प्रदेश, पंजाब, उत्तराखंड, गोवा आणि मणिपूर या राज्यांमध्ये निवडणुकीचं बिगुलं अखेर वाजले आहे. या निवडणूकीचा कार्यक्रम अखेर जाहीर झाला आहे. या पाच राज्यांपैकी 3 राज्यात राष्ट्रवादी निवडणूक लढवणार असल्याची घोषणा राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी केली. ते पत्रकार परीषदेत बोलत होते.
खेड प्रस्तावित विमानतळ : आमदार महेश लांडगेंच्या आवाहनाला शिरुरच्या आजी-माजी खासदारांची उत्तर !
पाच राज्यांपैकी 3 राज्यात राष्ट्रवादी निवडणूक लढवणार आहे. यामध्ये उत्तरप्रदेश, गोवा, मणिपुरमध्ये राष्ट्रवादी निवडणूक लढवणार आहेत. मणिपुरमध्ये कॉग्रेससोबत 5 जागांवर उमेदवार उभे करणार असल्याची माहिती शरद पवार यांनी दिली. तसेच निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर शरद पवार उत्तर प्रदेशचा दौरा करणार आहेत. उत्तर प्रदेशात परिवर्तन होणार असल्याचा विश्वास देखील व्यक्त केला. उत्तर प्रदेशातील जनता भाजपला बाजूला करणार गोव्यात मविआच प्रयोग करण्याचा प्रयत्न सुरुच असल्याचे ते म्हणाले.
पवार साहेबांची अॅलर्जी कोणाला; भुजबळांचा पडळकरांना खडा सवाल
दरम्यान, गोव्यात काँग्रेस, तृणमूल काँग्रेस आणि शिवसेनेसोबत आमची निवडणूकपूर्व युतीची चर्चा सुरू आहे. त्या ठिकाणी राष्ट्रवादीकडून खासदार प्रफुल्ल पटेल, शिवसेनेकडून संजय राऊत आणि काँग्रेसकडून स्थानिक नेते एकमेकांशी संवाद साधत आहेत. त्यातून नक्की मार्ग निघेल आणि आम्ही सर्वजण एकत्रितपणे निवडणुकीला सामोरे जावू. गोव्यात भाजपचे सरकार हटविण्यासाठी सर्वांनी एकत्रित प्रयत्नाची गरज आहे. आमच्या यूपीतील काही सहकाऱ्यांनी प्रचारासाठी येण्याचे निमंत्रण दिले आहे. माझ्यासह राष्ट्रवादीचे सर्व नेते प्रचारात सामील होणार आहोत. त्यामुळे मी लवकरच उत्तर प्रदेशाच्या दौऱ्यावर जाणार आहे, असेही त्यांनी यावेळी जाहीर केले.
Read also:
- युपी निवडणुकीपूर्वी भाजपला मोठा झटका; योगी सरकारमधील बड्या मंत्र्याचा राजीनामा
- मुंबई महानगरपालिका म्हणजे उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेसाठी कमाईचे साधन – किरीट सोमय्या
- …कारभार बीडच्या नावाला काळिमा फासणारे आहेत – पंकजा मुंडे
- “पवारांना बैठका घ्यायचाच असतील, तर मुख्यमंत्री त्यांनाच चार्ज का देत नाहीत?”
- पुण्यात भाजपला धक्का, 18 नगरसेवक राष्ट्रवादीच्या गळाला?