पुणे : नाताळच्या सुट्टीत आणि नवीन वर्षाच्या निमित्ताने कोरोना संसर्ग वाढण्याची शक्यता असल्याने ठाकरे सरकारने राज्यात नाईट कर्फ्यू लावण्याचा निर्णय घेतला आहे. राज्यातील सर्व महापालिका क्षेत्रात 22 डिसेंबरपासून रात्री 11 वाजल्यापासून सकाळी सहा वाजेपर्यंत संचारबंदी लागू करण्यात आली आहे.
पुणे महानगरपालिका क्षेत्रात देखील नाईट कर्फ्यू लागू होणार आहे. यासंदर्भात महापालिकेच महापौरी मुरलीधर मोहोळ यांनी ट्विट करत माहिती दिली आहे.
राज्यभर उद्यापासून ५ जानेवारीपर्यंत रात्री ११ ते पहाटे ६ पर्यंत संचारबंदी लागू करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला असून आपल्या पुणे महानगरपालिका हद्दीतही या संचारबंदीची अंमलबजावणी होत आहे.
पुणेकरांनी याची नोंद घ्यावी !#PuneFightsCorona
— Murlidhar Mohol (@mohol_murlidhar) December 21, 2020
राज्यभर उद्यापासून 5 जानेवारीपर्यंत रात्री 11 ते पहाटे 6 पर्यंत संचारबंदी लागू करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला असून आपल्या पुणे महानगरपालिका हद्दीतही या संचारबंदीची अंमलबजावणी होत आहे. पुणेकरांनी याची नोंद घ्यावी, असे आवाहन मोहोळ यांनी ट्विट करत केले आहे.
दरम्यान, राज्यातील सर्व महापालिका क्षेत्रात ही संचारबंदी 5 जानेवारीपर्यंत लागू असेल. ब्रिटनमध्ये कोरोना विषाणूचा नवा प्रकार आढळून आल्यानंतर खबरदारीचा उपाय म्हणून राज्य सरकारकडून हा निर्णय घेण्यात आला आहे.