अहमदनगर : कोरोना संकटाच्या काळात केलेल्या कामामुळे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार निलेश लंके सध्या चर्चेत आहे. लंके यांनी उभारलेल्या कोविड सेंटरचे सर्वत्र कौतुक होताना दिसत आहे. मात्र आता थेट मनसे पदाधिकाऱ्याला एक कोटींची नोटीस बजावल्याने निलेश लंके चर्चेत आले आहेत.
बनावट ऑडिओ क्लिप तयार करुन सोशल मीडियावर बदनामी केल्याचा आरोप करत निलेश लंके यांनी मनसे पदाधिकारी अविनाश पवार यांना 1 कोटींची अब्रुनुकसानीची नोटीस बजावली आहे.
आमदार निलेश लंके यांनी मनसे पदाधिकारी अविनाश पवार यांना दिलेल्या नोटीसमध्ये 1 कोटी 5 हजार रुपये देऊन लेखी माफी मागण्यासाठी 15 दिवसांचा कालावधी दिलाय. या 15 दिवसात त्यांनी तसं न केल्यास त्यांच्याविरोधात फौजदारी गुन्हा दाखल करु, असा इशारा दिला आहे.
तर दुसरीकडे, मनसे पदाधिकाऱ्याने निलेश लंके यांनीच शिविगाळ केल्याचा आरोप केला आहे. तसेच, त्यांनी व्हिडीओच्या माध्यमातून मनसे अध्यक्ष राज ठाकरेंकडे आवाहन केले आहे. बाळा नांदगावकर, अविनाश जाधव, संदीप देशपांडे यांच्यासह सर्व मनसे सैनिकांना माझी विनंती आहे की माझा हा व्हिडीओ मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यापर्यंत पोहचवा. साहेबांना सांगा की तुमचा मनसे सैनिक पूर्णपणे खचला आहे. आता सहन होत नाही. 11 मे रोजी माझ्यासोबत एक प्रसंग घडला. मी आरोग्य यंत्रणेच्या संपर्कात असताना पारनेरचे लोकप्रतिनिधी निलेश लंके यांनी डॉ. गंधे यांच्या फोनवरुन फोन केला. तेव्हा डॉ. गंधे यांनी मला आमदार लंकेंसोबत बोलण्यास सांगितले. तेव्हा लंके यांनी मला आणि मनसे पक्षाला आईवरुन शिवीगाळ केली. हे सर्व करुनही त्यांनी उलट मलाच खोटे अर्ज दाखल करुन अडकवण्याचा प्रयत्न केला असल्याचे अविनाश पवार म्हणाले.
Read Also :
- ‘अनिल परब फक्त दोन महिन्यांचे पाहुणे’
- ‘महाराष्ट्रातील 12 कोटी नागरिकांच्या लसीकरणासाठी असलेला चेक वठणार कधी?’
- ‘70 वर्षांत जे कमवलं ते सगळं 7 वर्षात मोदी सरकारने विकायला काढलं’
- 12वीच्या परीक्षांबाबत मुख्यमंत्री ठाकरेंनी पंतप्रधानांकडे केली ‘ही’ मागणी, म्हणाले…
- ‘इकडे फाटलेलं तोंड शिवणारे टेलर आहेत, आणखी जास्त फाटू नये याची काळजी घ्या’