मुंबई : महाराष्ट्रासह देशभरात सध्या कोरोना प्रतिबंधक लसीकरण मोहिम राबवली जात आहे. पहिल्या टप्प्यात कोरोना योद्धांना लस दिली जात आहे. याच पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री अजित पवार यांना तुम्ही लस कधी घेणार असे विचारले असता, परवानगी मिळाली की लस घेऊ असे म्हटले होते. अजित पवारांच्या या वक्तव्यावरून आता भाजप नेते निलेश राणेंना निशाणा साधला आहे.
पवारसाहेब वशिला लावून तुमच्यासाठी एक डोस बाजूला काढू शकतात, अशी बोचरी टीका निलेश राणेंना अजित पवारांवर केली आहे.
कोणाची परवानगी घेतली की आपण लस घ्यायला तयार व्हाल अजित पवार साहेब? तुम्ही ठरवलं लस घ्यायची आहे तर तुम्हाला थांबवणार कोण? पवार साहेब वशिला लावून तुमच्यासाठी एक डोस बाजूला काढू शकतात पण नेहमी पळवाट काढणं बरं नव्हे. पवार साहेबांवर तरी विश्वास आहे ना तुमचा??https://t.co/6qXMnXrOyk
— Nilesh N Rane (@meNeeleshNRane) January 22, 2021
कोणाची परवानगी घेतली की आपण लस घ्यायला तयार व्हाल अजित पवार साहेब? तुम्ही ठरवलं लस घ्यायची आहे तर तुम्हाला थांबवणार कोण?, असा निलेश राणेंना केला.
पवार साहेब वशिला लावून तुमच्यासाठी एक डोस बाजूला काढू शकतात पण नेहमी पळवाट काढणं बरं नव्हे, असा टोला देखील त्यांनी ट्विटमधून लगावला. पवार साहेबांवर तरी विश्वास आहे ना तुमचा?, असा खोचक सवाल देखील राणेंनी यावेळी अजितदादांना विचारला.
Read Also :
- ‘हे तर पवारांचे स्वत: विरुद्धच आंदोलन’, भाजपची टीका
- ‘मुख्यमंत्री होण्याची मला कोणतीही घाई नाही’
- काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाच्या शर्यतीत सुशीलकुमार शिंदे आघाडीवर?
- ‘लवकरात लवकर नोकरभरती करा, अन्यथा…’, प्रकाश शेंडगेंचा इशारा
- पुणे महापालिकेतील भाजपचे 19 नगरसेवक राष्ट्रवादीत जाणार? अजित पवार म्हणाले…