नवी दिल्ली : काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांनी पक्षाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा देऊन दीड वर्षांपेक्षा अधिक काळ झाला आहे. असे असले तरी अद्याप पक्षाला पूर्णवेळ अध्यक्ष मिळालेला नाही. राहुल गांधी यांच्यानंतर सोनिया गांधी यांनी हंगामी अध्यक्षपद स्विकारलेला आहे. काही दिवसांपूर्वीच अध्यक्षपदासाठी काँग्रेस पक्षात निवडणूक होणार असल्याच्या चर्चा सुरू होत्या. आता या पदासाठीच्या निवडीमध्ये अनेक नावे चर्चेत आहेत.
काँग्रेस कार्य समितीच्या बैठक पार पडली. मात्र मात्र, या बैठकीत मेमध्ये काँग्रेसच्या अध्यक्षपदासाठी निवडणूक घेण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे सांगितले जात आहे.
काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाच्या शर्यतातील महाराष्ट्रातील काँग्रेसचे वरिष्ठ नेते सुशीलकुमार यांचे नाव देखील आघाडीवर आहे. याव्यतिरिक्त अशोक गेहलोत आणि मीराकुमार या नेत्यांची नावे देखील चर्चेत आहेत.
काँग्रेस कार्यकारिणीच्या बैठकीत पाच राज्यांच्या निवडणुकीनंतर काँग्रेस अध्यक्षपदाची निवडणूक होणार असल्याची माहिती मिळतेय. पश्चिम बंगाल, केरळ, तामिळनाडू सह पाच राज्यांच्या निवडणुका एप्रिल-मे मध्ये होणार आहेत. या निवडणुकांचा निकाल लागल्यानंतर मे-जूनमध्ये काँग्रेस अध्यक्षपदासाठी निवडणूक होणार आहे.
पक्षाध्यक्षपदासाठी सुशीलकुमार शिंदे यांच्या नावाची जोरदार चर्चा सुरू झाल्याने आता त्यांना हे पद मिळणार का ? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
Read Also :
- ‘लवकरात लवकर नोकरभरती करा, अन्यथा…’, प्रकाश शेंडगेंचा इशारा
- पुणे महापालिकेतील भाजपचे 19 नगरसेवक राष्ट्रवादीत जाणार? अजित पवार म्हणाले…
- ट्रम्प यांनी माझं ऐकलं असतं तर ही वेळ आली नसती – रामदास आठवले
- शेतकरी आंदोलन : फडणवीसांनी घेतली अण्णा हजारेंची भेट, मात्र…
- मुंडेंविरोधातील बलात्काराची तक्रार महिलेने मागे घेतल्यानंतर शरद पवार म्हणाले…