कोल्हापूर : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्याविरोधात महिलेने बलात्काराचा आरोप केल्यानंतर राज्यातील राजकारणात वादळं उठले होते. मात्र आता या महिलेनेच मुंडेंविरोधात तक्रार मागे घेतली आहे.
रेणू शर्मा या महिलेने मुंडेंविरोधातील तक्रार मागे घेतल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी प्रतिक्रिया दिली असून, आमचा निष्कर्ष बरोबर होता, असे त्यांनी म्हटले आहे.
शरद पवार म्हणाले की, त्याविषयी फारशी माहिती नाही. मात्र या संबंधात कागदपत्रं जेव्हा आमच्या हातात आली, तेव्हा खोलात जाण्याची गरज आहे, असा आम्ही निष्कर्ष काढला. त्यामुळे तो बरोबर होता असं म्हणायला लागेल.
तर दुसरीकडे, भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी रेणू शर्माविरोधात कारवाई करण्याची मागणी केली आहे. खोटे आरोप केल्याप्रकरणी IPC192 नुसार तात्काळ कारवाई पोलिसांनी करावी, अशी मागमी त्यांनी केली आहे.
Read Also :
- रेणू शर्मांवर पोलिसांनी तात्काळ कारवाई करावी, चित्रा वाघ यांची मागणी
- मी पुन्हा येईन… आज लोकसभा निवडणुका झाल्या तर अशी असेल स्थिती
- अर्णब गोस्वामींच्या अटकेसाठी काँग्रेस राज्यभर करणार आंदोलन
- भंडारा दुर्घटनेचा चौकशी अहवाल सादर, आरोग्य विभागाची मोठी कारवाई
- धनंजय मुंडेंवर बलात्काराचा आरोप करणाऱ्या महिलेने मागे घेतली तक्रार